सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा लवकरच! मतदार कार्यक्रम जाहीर

soyagaon nagarpanchayat
soyagaon nagarpanchayat

सोयगाव (औरंगाबाद): सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यासाठीची प्रक्रिया हाती घेण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी माधुरी तिखे यांनी बुधवारी दिली. त्यामुळे सोयगाव नगर पंचायतीसाठी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नगरपंचायतीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १५ जानेवारी २०२१ ही अहर्ता दिनांक ग्राह्य धरून यादी नगर पंचायतीसाठी वापरण्यात येणार आहे. या मुदतीपर्यंत नवीन नोंदणी झालेल्या मतदार व दुरुस्त्या तातडीने हाती घेवून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ता.१५ फेब्रुवारीला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल, प्रारूप मतदार यादीवर हरकती व व सूचना दाखल करण्यासाठी १५ ते २२ फेब्रुवारी पर्यंत कालावधी असणार आहे.

अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यासाठी १ मार्च मुदत देण्यात आली आहे. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्धीसाठी 8 मार्च अंतिम मुदत आहे. त्यामुळे सोयगाव नगर पंचायतीचा मतदार यादीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून आता सोयगाव नगर पंचायत निवडणुकीसाठी पूर्वतयारी हाती घेण्यात आली आहे.

राजकीय पक्षांकडून उमेदवारी चाचपणी सुरु-
सोयगाव नगर पंचायतीसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर होताच सोयगावला राजकीय वातावरण तापले असून शिवसेना,भाजपा,राष्ट्रवादी कॉंग्रेस आदि पक्षांकडून उमेदवारी साठी चाचपणी सुरु झाली आहे.त्यामुळे सोयगावात पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे.सतरा प्रभागांसाठी सोयगाव नगर पंचायतीसाठी मतदान होणार असून राजकीय पक्षांकडून तयारी हाती घेण्यात आली आहे.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com