महात्मा बसवेश्‍वर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबादेत वाहनफेरी

मनोज साखरे
बुधवार, 18 एप्रिल 2018

खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, महात्मा बसवेश्‍वरांनी पोटजाती एकत्र केल्या. आंतरजातीय विवाहही लावले. आपण समान आहोत. हा समानतेचा हक्क महात्मा बसवेश्‍वरांनी मिळवून दिला.

औरंगाबाद - महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबादेतील महात्मा बसवेश्‍वर चौक (आकाशवाणी) येथून बुधवारी (ता. 18) वाहन फेरी काढण्यात आली. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते तसेच शिवा संघटनेतर्फे ध्वजवंदन करण्यात आले. बसवेश्‍वर चौक येथे दोन वेगवेगळ्या व्यासपीठावर महात्मा बसवेश्‍वरांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

यावेळी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, "महात्मा बसवेश्‍वरांनी पोटजाती एकत्र केल्या. आंतरजातीय विवाहही लावले. आपण समान आहोत. हा समानतेचा हक्क महात्मा बसवेश्‍वरांनी मिळवून दिला. त्यामुळे आपण एकत्र येणे महत्वाचे आहे. राजकीय अडचण असल्याने आठ एप्रिलला मोर्चात प्रत्यक्ष भाग न घेता पाठींबा दिला. महात्मा बसवेश्‍वरांचे विचार देशाला तारक आहेत.''

तर दुसऱ्या व्यासपीठावर शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे म्हणाले, "अकरा वर्षे झाली. परंतू, राजकारणी जयंतीवेळी व्यासपीठावर येतात व आश्‍वासने देतात. परंतू, आता आम्ही महात्मा बसवेश्‍वरांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी लढा उभारणार असून मे महिण्यात याची सुरवात होईल.'' यानंतर कार्यक्रम स्थळापासून महात्मा बसवेश्‍वर यांच्या जयघोषात वाहनफेरी निघाली. हडकोतील स्वामी विवेकानंद उद्यानातील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर फेरीचा समारोप झाला. यावेळी अनेक समाजबांधव सहभागी झाले होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: In the Aurangabad rally of Mahatma Baseeshwar