मुलींचा जन्मदार ही चिंतेची बाब 

अनिलकुमार जमधडे 
शुक्रवार, 30 मार्च 2018

राज्यात मुलांच्या तुलनेत अकरा लाख मुली कमी 

औरंगाबाद - मुलींचा जन्मदर हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय झाला आहे. मराठवाड्यात सर्वाधिक वाईट परिस्थिती असून, बीड जिल्ह्यात भ्रुण हत्येचे प्रमाण मोठे आहे. बीड जिल्ह्यात एक हजार मुलांच्या मागे 912 मुली आहेत. तर परभणी जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बरी परिस्थिती आहे. परभणी जिल्ह्यात मुलींचा जन्मदार 940 इतका आहे. राज्यात मुलांच्या तुलनेत सव्वापाच लाख मुली कमी असल्याचे समोर आले आहे. भविष्यात हा जन्मदर आणखी खाली येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

मुलींचा जन्मदर कमी असणे ही केवळ आजची समस्या नाही. गेल्या वीस वर्षातील मुलींच्या जन्मदराच्या आकडेवारीवर नजर टाकल्यानंतर चिंता करावी अशीच परिस्थिती कायम आहे. मुलांच्या तुलनेत साधारण एक हजार मुलांच्या मागे शंभर मुली कमी आहेत. गेल्या वीस वर्षात हा अकडा तीस मुलींच्या संख्येने कमी जास्त होत आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या वाढत नाही, ही सर्वात मोठी चिंता आहे.

काय आहे परिस्थिती 
केंद्र सरकारच्या सांख्यकी मंत्रालयाने सन 2017मध्ये प्रकाशित केलेला अहवाल "युथ इन इंडिया' नुसार, 2021मध्ये मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे 907 इतका घटेल. तर सन 2031मध्ये हाच आकडा 898 पर्यंत कमी हेण्याची शक्यता आहे. 2016मध्ये प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार 6 ते 10 वयोगटात महाराष्ट्रात 54,36,233 मुले आणि 48,22,446 मुली अशी आकडेवारी होती. तर 11 ते 13 वयोगटात 32,89,087 मुले आणि 27,74,192 मुली असे प्रमाण आहे.

Web Title: aurangabad reducing number of the girl child is a matter of concern