औरंगाबादेतील दंगल पूर्वनियोजित कट नव्हे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

औरंगाबाद - शहरातील शहागंज, राजाबाजार भागात घडलेली दंगल पूर्वनियोजित कट नाही; पण महापालिकेकडून विशिष्ट समूहावरच कारवाई केली जात असल्याच्या मानसिकतेतून केलेली ही कृती असल्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत, अशी माहिती प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी शुक्रवारी दिली.

भारंबे म्हणाले, ‘‘दोन वसाहतींत दोन्ही गटांचे नागरिक राहतात. त्यांच्या घरांना नुकसान पोचलेले नाही. दोन्ही समूहांच्या स्त्रियांशी छेडछाड अथवा त्रास दिल्याचे तक्रारीत समोर आलेले नाही. याचा अर्थ, औरंगाबादेतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता, हे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल; पण कुठल्याही कारणाने दंगल झालीच; तर काहीतरी हत्यार आपल्याकडे असावे, असा उद्देश ठेवून रोष असलेल्या तरुणांनी अथवा गटाने पूर्वतयारी केली असे म्हणता येईल. हिंसाचार पसरण्यास अफवांचा मोठा हातभार होता.’’

Web Title: aurangabad riot pre planning police