घर खाक झाल्याने शर्मा कुटुंबीय रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

औरंगाबाद - शहरातील राजाबाजार परिसरात राहत असलेल्या शर्मा कुटुंबीयांचे घर दंगलीमध्ये समाजकंटकांनी शुक्रवारी (ता. ११) रात्री पेटवून दिले. यात घरातील सर्व साहित्यासह अन्नधान्य, कपडे, दैनंदिन वापरातील वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. त्यामुळे शर्मा कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले असून, ते रस्त्यावर आले आहेत.    

राजाबाजारमध्ये संस्थान गणपती मंदिराच्या बाजूला शर्मा कुटुंबाचे शंभर वर्षांपूर्वीचे घर आहे. यामध्ये गोविंद बजरंगलाल शर्मा हे मुलगा, दोन मुली आणि पत्नीसह राहत होते. गोविंद हे जुन्या मोंढ्यात अगरबत्तीच्या दुकानावर काम करतात; तर त्यांची एक मुलगी फार्मा कंपनीत आणि दुसरी एका कापड दुकानात नोकरीला आहे. घटनेच्या वेळी शर्मा कुटुंबीयांनी सावधगिरी बाळगल्याने त्यांचा जीव वाचला; पण घरासह त्यातील अन्नधान्य, कपडे, शैक्षणिक आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याचे माधुरी शर्मा यांनी सांगितले. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे शर्मा कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले. शिवाय घर जळाल्यानंतर त्यांना जीव मुठीत घेऊन रात्र बाहेर काढावी लागली. 

Web Title: aurangabad riot Sharma family on the street due to the house fire