अहो आश्‍चर्यम्‌...आरटीओंनी जप्त केलेल्या वाहनांत दलालांची "दुकान'दारी! 

अनिल जमधडे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाने जप्त केलेल्या विविध चारचाकी वाहनांवर दलालांनी कब्जा मिळवला आहे. जप्त वाहनांना काही दलालांनी आपल्या कार्यालयाचे स्वरुप दिले आहे. याच वाहनातून कागदपत्र तयार दुकाने थाटण्यात आले आहेत. 

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाने जप्त केलेल्या विविध चारचाकी वाहनांवर दलालांनी कब्जा मिळवला आहे. जप्त वाहनांना काही दलालांनी आपल्या कार्यालयाचे स्वरुप दिले आहे. याच वाहनातून कागदपत्र तयार दुकाने थाटण्यात आले आहेत. 

आरटीओ कार्यालयाच्या नाकर्तेपणामुळे कार्यालयाच्या आवारात सध्या वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. जप्त केलेल्या वाहनांनी कार्यालयाचा संपूर्ण परिसर व्यापला गेला आहे. सध्या जप्त वाहनांच्या पार्कींगमुळे आवारात कुठेही जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळेच दलालांनी जप्त केलेल्या मोठ्या बस, मिनिबस यासारख्या चारही बाजूने बंद असलेल्या वाहनांचा आपल्या कामासाठी वापर सुरु केला आहे. या बस आणि वाहनांमध्ये बसूनच कामकाज केले जात आहे. कागदपत्र तयार करणे, फॉर्म भरणे यासारखी कामे वाहनांमध्ये बसून केली जात आहेत.

अनेक दलालांचा दिवसभर बसण्याचा अड्डा म्हणजे जप्त बस अशी ओळख झाली आहे. तर काही टोळकेही ठराविक वाहनांमध्ये दिवसभर बसलेले असतात. मात्र, याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांना कुठलेही सोयरसुतक राहिलेले नाही. जप्त करेपर्यंतच आमची जबाबदारी, पुढे त्या वाहनाचे काहीही होवो, अशी या अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे. 

हेही वाचा : आमदाराचे पिस्तुल गुन्हेगाराकडे 

आरटीओची असते जबाबदारी 

मुळात जप्त केलेले वाहन हे आरटीओच्या ताब्यात असते. त्यामुळे या वाहनांची जबाबदारीही आरटीओ कार्यालयाची आहे. मात्र आरटीओ अधिकारी लक्ष देत नसल्याने वाहनांमध्ये बसलेले लोक सीट फाडणे, वाहनांमध्येच बसून गुटखा, तंबाखुच्या पिचकाऱ्या मारणे असे प्रकार करत आहेत. जप्त केलेल्या वाहनांचा प्रत्येक वर्षी लिलाव करणे आवश्‍यक असताना, आरटीओ कार्यालय दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आरटीओच्या कार्यालयाच्या परिसरात जागाच शिल्लक राहिली नाही. त्यातच जप्त वाहनांचा दुरउपयोग केला जात आहे.

हेही वाचा : हिदू तरुणांवरील गुन्हे मागे घ्या  

वाहने झाली भंगार 

आरटीओ कार्यालयाच्या आवारात जप्त केलेल्या वाहनांमध्ये ऑटोरिक्षा, बस, मिनीबस, जीपसह ट्रक, टिप्पर, कंटेनर अशा अनेक अवजड वाहनांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून ही वाहने उभी असल्याने भंगार झाली आहेत. त्यातील काहींचा तर नुसता सांगाडाच उरला आहे. या जप्त वाहनांच्या बॅटरी, स्टेपनी, सीट, इंजिनचे पार्ट चोरीला गेले आहेत. तरही अधिकारी लक्ष देण्यास तयार नाहीत, ही गंभीर बाब आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Rto News