परवाना वाहन चालविण्याचा की अपघाताचा?

अनिल जमधडे  
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - आरटीओ कार्यालयाच्या आवारात असलेल्या चाचणी ट्रॅकभोवती वाहनांचा गराडा पडला आहे. उभ्या असलेल्या वाहनांच्या गराड्यातूनच वाहन चालविण्याची टेस्ट द्यावी लागते. वाहनाची चाचणी म्हणजे केवळ सोपस्कार पार पाडण्याचे काम केले जात आहे. 

औरंगाबाद - आरटीओ कार्यालयाच्या आवारात असलेल्या चाचणी ट्रॅकभोवती वाहनांचा गराडा पडला आहे. उभ्या असलेल्या वाहनांच्या गराड्यातूनच वाहन चालविण्याची टेस्ट द्यावी लागते. वाहनाची चाचणी म्हणजे केवळ सोपस्कार पार पाडण्याचे काम केले जात आहे. 

आरटीओ कार्यालयातून वाहनांसाठी वाहन चालविण्याचा पक्का परवाना देण्यासाठी कार्यालयाच्या आवारात चाचणी ट्रॅक केलेला आहे. ट्रॅकवर गोलाकार वळण घेऊन वाहनचालकाला परत यावे लागते, तर चारचाकी वाहनचालकाला गोलाकार चढाव चढून आणि उतरून खाली यावे लागते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या चाचणी ट्रॅकभोवती जप्त केलेल्या वाहनांना उभे करून ठेवले आहे. याशिवाय दररोज चाचणी देण्यासाठी येणाऱ्या वाहनांचा आणि मोटार ड्रायव्हिंग  स्कूलच्या वाहनांचाही ट्रॅकभोवती गराडा असतो. यातून  दुचाकीस्वार आणि चारचाकी चालकाला वाट काढून टेस्ट द्यावी लागत आहे. विशेष म्हणजे समोरच वाहन निरीक्षकांचे लक्ष असते, मात्र वाहने उभी करून ठेवलेली असल्याने वाहन निरीक्षकांनाही केवळ चाचणी घेण्याचे सोपस्कार पार पाडावे लागतात. विशेष म्हणजे वाहनचालकांत अनेकजण नवशिके असतात, त्यांच्याकडून ट्रॅकभोवती उभ्या असलेल्या वाहनांना धडका बसून अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

दिसेल तिथे वाहने  
आरटीओ कार्यालयाने विविध ठिकाणी जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. कार्यालयाच्या आवारात दिसेल तिथे वाहने उभी करून ठेवलेली आहेत. वाहन चाचणी ट्रॅकच्या भोवती थोडीफार जागा शिल्लक होती, त्या ठिकाणीही वाहने उभी करून ठेवल्याने वाहन चाचणी घेताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

Web Title: aurangabad rto office drives license