आरटीओत वाहनचालकांची पळापळ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

औरंगाबाद - परिवहन कार्यालयात दुचाकी वाहनांची बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. आरटीओ अधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या आवारात बेशिस्त लावलेल्या वाहनांना जामर लावले, त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईने वाहनधारकांना पळापळ करावी लागली. 

परिवहन कार्यालयात परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी मोठ्या प्रमाणावर शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. बेशिस्त उभ्या राहणाऱ्या वाहनांना पार्किंगच्या नियमांची सक्ती करण्यात आली आहे. असे असले तरीही वाहनधारक कुठेही बेशिस्त वाहने उभी करतात. दोन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवारी (ता. 21) कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. कार्यालयात येणाऱ्यांचा ओघ वाढत असल्याने दुपारपर्यंत कार्यालयाच्या आवारात वाहनांची प्रचंड गर्दी झाली. बेशिस्त लावलेल्या वाहनांमुळे परिसरातून पायी चालणेही अवघड झाले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेळके यांनी जामर लावून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सहायक परिवहन अधिकारी किरण मोरे, श्रीकृष्ण नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन निरीक्षकांनी बेशिस्त वाहनांना जामर लावले. जवळपास पन्नास वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. 

Web Title: aurangabad rto vehicle

टॅग्स