नाशिक, जळगावच्या विनावाहक सेवा बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद : खासगी वाहतुकीच्या स्पर्धेत उतरत प्रवाशांना थेट सेवा देण्यासाठी एस. टी. महामंडळातर्फे सुरू करण्यात आलेल्या विनावाहक बसगाड्या एकापाठोपाठ एक बंद करण्याची नामुष्की महामंडळावर येत आहेत.

शहरभर प्रचार करून एसटीने औरंगाबाद-नाशिक विनावाहक दर अर्ध्या तासाला एक बससेवा सुरू केली. या सेवेनंतर औरंगाबाद-जळगाव ही विनावाहक सेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांचा अल्पप्रतिसाद येत असल्यामुळे एस. टी. महामंडळाने हा निर्णय घेतला असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महामंडळाचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक पी. एस. सावंत यांनी कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे औरंगाबादेतून दुसऱ्या शहराला जोडणारी थेट बससेवा सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. यात औरंगाबाद-नाशिक ही दर अर्ध्या तासाला जाणारी विनावाहक बससेवा एक ऑगस्टपासून सुरू करण्यात आली.

यासाठी शहरात या बसला स्टीकर लावून जोरदार प्रचारही करण्यात आला होता. याला प्रतिसाद मिळाल्यानंतर पाच ऑगस्टपासून औरंगाबादेतून जळगावसाठी त्यापाठोपाठ धुळ्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली. अवघ्या साडेतीन महिन्यांत प्रवाशांअभावी ही सेवा एस. टी. ला बंद करावी लागली.

प्रवाशांना नियमित वेळेपेक्षा लवकर पोहोचविण्यासाठीच ही सेवा सुरू करण्यात आली होती. औरंगाबाद-पुणे मार्गावर ही सेवा नियमित सुरू आहे. नाशिक आणि जळगावसाठी असणाऱ्या प्रत्येक फेरीला अत्यल्प उत्पन्न मिळत असल्याने एसटीचे मोठे नुकसान होत होते. यामुळे दोन दिवसांपूर्वी नाशिकसाठी सेवा बंद झाली. शनिवारपासून (ता.26) जळगावसाठी सेवा बंद करण्यात आली आहे. आता केवळ धुळ्यासाठी सेवा सुरू आहे. टापरगाव येथील पुलामुळे या मार्गावर एसटीच्या अडचणी वाढल्या असून ही सेवाही बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

टप्पा वाहतूक नियमित
प्रवाशांना जलद सेवा देण्यासाठी एसटीतर्फे विनावाहक सेवा सुरू करण्यात आली; मात्र प्रवाशांअभावी हा उपक्रमही फसला. एसटीची टप्पा वाहतूक अजूनही नेहमीप्रमाणे सुरू आहे. यापुढेही सुरू राहणार आहे. नाशिक, जळगावच्या विनाहक बस बंद करण्यात आल्या असल्या तरी हिरकणी आणि नियमित सेवा सुरू आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांनी दिली.

Web Title: Aurangabad ST depot to shut down services to Nashik, Jalgaon