डाव्यांच्या आघाडीतही बिघाडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी सहा पक्षांना एकत्र घेऊन पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन केलेल्या डाव्या, पुरोगामी पक्षांमध्येसुद्धा उमेदवार उभे करण्यावरून एकमत झालेले नाही. त्यामुळे काही गटांत, गणांत या पक्षांचेच उमेदवार समोरासमोर उभे राहिले आहेत. भारिप-बहुजन महासंघाने स्वतंत्रपणे मुलाखती घेऊन 8 गट, दहा गणांत उमेदवार दिले आहे. शेतकरी कामगार पक्षानेसुद्धा स्वतंत्र मुलाखती घेऊन उमेदवार दिले, तर भाकपनेसुद्धा तीन गट आणि चार गणांत उमेदवार देऊन प्रचाराला सुरवातही केली आहे. आता मंगळवारी (ता.

औरंगाबाद - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी सहा पक्षांना एकत्र घेऊन पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन केलेल्या डाव्या, पुरोगामी पक्षांमध्येसुद्धा उमेदवार उभे करण्यावरून एकमत झालेले नाही. त्यामुळे काही गटांत, गणांत या पक्षांचेच उमेदवार समोरासमोर उभे राहिले आहेत. भारिप-बहुजन महासंघाने स्वतंत्रपणे मुलाखती घेऊन 8 गट, दहा गणांत उमेदवार दिले आहे. शेतकरी कामगार पक्षानेसुद्धा स्वतंत्र मुलाखती घेऊन उमेदवार दिले, तर भाकपनेसुद्धा तीन गट आणि चार गणांत उमेदवार देऊन प्रचाराला सुरवातही केली आहे. आता मंगळवारी (ता. सात) अर्ज मागे घेण्याच्या दिवशी किती उमेदवार एकमेकांच्या विरुद्ध राहतात हे स्पष्ट होईल. 

शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारिप-बहुजन महासंघ, बीआरएसपी, जनता दल सेक्‍युलर या पक्षांनी मिळून स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र यामध्ये शेकाप, भाकप आणि भारिप-बहुजन या तीन पक्षांचे उमेदवार मैदानात आहेत. विशेष म्हणजे काही गट आणि गणांत या आघाडीतील उमेदवार समोरासमोर आहेत. त्यामुळे डाव्यांच्या डाव्यांच्या आघाडीतही बिघाडी झाल्याचे चित्र आहे. 

भाकपने दिले स्वतंत्रपणे उमेदवार 
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 3 गट आणि 4 गणांत उमेदवार दिलेले आहेत. त्यांनी आपल्या प्रचारालासुद्धा प्रारंभ केलेला आहे. भाकपने अंबेलोहळ, बाबरा गटात उमेदवार दिलेले आहेत. विशेष म्हणजे येथे भारिप-बहुजन महासंघानेसुद्धा उमेदवार दिलेले आहेत. पुरोगामी लोकशाही आघाडी असली, तरी भाकपने त्यांच्या नेत्यांना घेऊन सभांचे आयोजन केले आहे. 

भारिप 8 गट, दहा गणांत 
डाव्या आघाडीत असलेल्या भारिप-बहुजन महासंघाने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत स्वतंत्रपणे मुलाखती घेतल्या होत्या. त्यांना 8 गट आणि दहा गणांत उमेदवार दिलेले आहे. स्वतंत्र उमेदवार दिल्यामुळे भारिप पुरोगामी आघाडीतून बाहेर पडल्यासारखीच आहे. अंबेलोहळ, जोगेश्‍वरी, वाळूज येथे त्यांनी उमेदवार दिलेले आहेत; तसेच पक्षाच्या आमदारांच्या सभा होतील, असे नियोजन केले आहे. 

आम्ही स्वतंत्रपणे मुलाखती घेऊन उमेदवार दिलेले आहेत. अंबेलोहळ, जोगेश्‍वरी, वाळूज येथे उमेदवार असल्याने या भागात आमच्या पक्षाच्या आमदारांची सभा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 
- अमित भुईगळ (जिल्हाध्यक्ष, भारिप-बहुजन महासंघ) 

पुरोगामी लोकशाही आघाडीच्या सुरवातीला बैठका झाल्या होत्या; मात्र यानंतर आम्ही गट, गणांत सात उमेदवार दिलेले आहेत. पक्षाच्या उमेदवारांसाठी आम्ही प्रचारसभांचे आयोजन केले आहे. 
- प्रा. राम बाहेती (जिल्हा सचिव, भाकप) 

Web Title: aurangabad zp panchayat election