जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी बुंऽऽऽगमध्ये बसून हैद्राबादकडे! 

औरंगाबाद : हैद्राबादला रवाना होण्यापुर्वी लाडसावंगी येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे विद्यार्थी.
औरंगाबाद : हैद्राबादला रवाना होण्यापुर्वी लाडसावंगी येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे विद्यार्थी.

औरंगाबाद- अभ्यास म्हटले की पुस्तकात डोकं खुपसून मानमोडेपर्यंत वाचत बसावे लागणार असे विद्यार्थ्यांना वाटते; परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना अभ्यास दौरा म्हटले की कंटावळवाणे नव्हे तर त्यांच्या उत्साहाला उधान आले. कारण हा अभ्यास दौरा काही कुठं गावाच्या आजूबाजूला जायचा नव्हे तर थेट हैद्राबादला आणि तेही विमानात बसून जायचे होते. यामुळे लाडसावंगी येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या या विद्यार्थ्यांमध्ये धाकधुकीसोबतच कुतूहल होते. 

जिल्हा परिषदेच्या लाडसावंगी येथील शाळेतील इयत्ता नववी आणि दहावीच्या 20 विद्यार्थ्यांच्या हैद्राबाद अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी तर काही शिक्षकांनी अर्थिक भार उचलला आणि या विद्यार्थ्यांना हैद्राबाद येथे जाण्यासाठी हे विद्यार्थी सर्व तयारीनिशी निघाले.

मुख्याध्यापक गोरखनाथ नजन यांनी सांगितले, की एकूण 20 विद्यार्थी या अभ्यास दौऱ्यात आहेत. यामध्ये 15 मुली आणि पाच मुले आहेत. तीन दिवसांचा हा अभ्यास दौरा आहे. यात हैद्राबादमधील जवाहरनगर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देऊन कचऱ्याचे कसे व्यवस्थापन केले जाते, प्रक्रिया करून काय तयार केले जाते याविषयी माहिती घेतली जाणार आहे. 

सोमवारी (ता. नऊ) शिक्षकांसह सर्व विद्यार्थी विमानाने हैद्राबादकडे रवाना झाले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती मीना शेळके, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल, उपशिक्षणाधिकारी अश्‍विनी लाटकर, गट शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. जीवरग यांनी अभ्यास दौऱ्यातील विद्यार्थ्यांना विमानतळावर जाऊन शुभेच्छा दिल्या. सहलीच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक गोरखनाथ नजन, शिक्षक युनूस शेख, अनिल भालेराव, प्रभू कोंडके, फरजानाबी शेख, सारिका जैन, वंदना घुगे, संभाजी धोंगडे, श्री. गुंजाळ आदींनी पुढाकार घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com