औरंगाबाद महापालिका उभारणार दोनशे ‘ई-चार्जिंग स्टेशन’

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार
 E charging Station
E charging Stationsakal

औरंगाबाद : शहरांचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढविण्यास शासन प्रोत्साहन देत आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करावीत, यासाठी महापालिकेने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून दोनशे ई-चार्जिंग सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे हवेतील कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले आहे. त्यानुसार स्मार्ट सिटीतर्फे पाच इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यात आल्या आहेत. महापालिकेत देखील अशा कार घेतल्या जाणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढणार असल्यामुळे चार्जिंग स्टेशनची गरज भासणार आहे. दरम्यान महापालिकांना देण्यात आलेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील ८५ टक्के निधी ई-वाहने, ई-चार्जिंग सेंटर यावर खर्च केला जाणार आहे.

या संदर्भात प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी कार्यालयाने पाच ई-वाहने खरेदी केली आहेत. महापालिका पदाधिकाऱ्यांसाठी १५ व्या वित्त आयोगातून ई-वाहने खरेदी केली जाणार आहे. त्यासोबतच ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात दोनशे ठिकाणी ई-चार्जिंग सेंटर उभारले जातील. महापालिकेच्या कार्यालयापासून या कामाची सुरुवात केली जाईल. सर्व सरकारी कार्यालयात ई-चार्जिंग सेंटर राहणार असून पेट्रोलपंप, मॉल, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, व्यापारी संकुल या ठिकाणीही ई-चार्जिंग सेंटर केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com