रेल्वेच्या नांदेड विभागातून ६ मालगाड्या एकाच दिवशी रवाना

१५ हजार टन मालाची वाहतूक करत रेल्वेने तब्बल २.३३ कोटी रुपये महसूल मिळवला
6 freight trains departed from Nanded section of South Central Railway aurangabad
6 freight trains departed from Nanded section of South Central Railway aurangabadsakal

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून पहिल्यांदाच एकाच दिवशी सहा मालगाड्या रवाना करण्यात आल्या आहेत. यातून १५ हजार टन मालाची वाहतूक करत रेल्वेने तब्बल २.३३ कोटी रुपये महसूल मिळवला आहे. नांदेड रेल्वे विभागातून शुक्रवारी (ता. ११) पहिल्यांदाच एकाच दिवशी ६ रेक मालगाड्या रवाना झाल्या. या ६ माल गाड्यांमधून देशातील विविध भागात १५१९५ टन माल वाहतूक करण्यात आली, ज्यातून रेल्वेला २.३३ कोटी रुपये महसूल मिळाला. याबद्दल विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी बिजिनेस डेव्हलपमेंट टीमचे अभिनंदन केले आहे.

अशी आहे मालवाहतूक

औरंगाबाद येथून दोन वर्षांच्या अवधी नंतर अझारा (आसाम) येथे २६५८ टन साखर पाठविण्यात आली. यामुळे रेल्वे ला ६३.१७ लाख रुपये महसूल मिळाला. आदिलाबाद येथून प्रथमच तीरुपूर आणि इरोड (तामिळनाडू) येथे २६६७ टन ज्वारी पाठविण्यात आली. त्यामुळे रेल्वेला ४९.४७ लाख रुपये महसूल मिळाला. दौलताबाद येथून जवाहरलाल नेहरू पोर्ट टर्मिनल येथे कंटेनर मधून ११८४ टन माल वाहतूक करण्यात आली. यातून रेल्वेला ०६.१४ लाख रुपये महसूल मिळाला. नगरसोल येथून फातुवा (बिहार) येथे ३३६४ टन कांदा पाठविण्यात आला. यातून रेल्वे ला ३६.५२ लाख रुपये महसूल मिळाला. परभणी येथून दानकुनी (पश्चिम बंगाल) येथे २६६४ टन साखर पाठविण्यात आली. यातून रेल्वेला ५३.८२ लाख रुपये महसूल मिळाला. तर वसमत येथून चालठाण (गुजरात) येथे २६५८ टन साखर पाठविण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com