Aurangabad | 'बामू'च्या विभाजनाला विरोध, कृती समितीची निदर्शने

विद्यापीठ के सम्मान में, भीम सैनिक मैदान में !
Bamu News
Bamu News esakal

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करण्यासंदर्भात शासनस्तरावर सुरू असलेली प्रक्रिया थांबवण्यात यावी या प्रुमख मागणीसाठी शुक्रवारी (ता.दहा) विभागीय आयुक्त कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आले. आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने औरंगाबाद (Aurangabad) येथील विभागीय आयुक्त कार्यालयापुढे जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे कि, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यापीठाला नाव द्यावे या मागणीसाठी अनेक कुटंबे उद्धवस्त झाली. (Action Committee Agitation Against Division Of Babasaheb Ambedkar Marathwada University In Aurangabad)

Bamu News
नुपूर शर्माला फाशी द्या; इम्तियाज जलील यांची केंद्राकडे मागणी

नामांतरासाठी १७ वर्ष संघर्ष करावा लागला. या रक्तरंजित संघर्षानंतर, अनेकांच्या बलिदानानंतर विद्यापीठाचे नामांतर झाले नाही तर नामविस्तार करण्यात आला आणि त्यावेळी नांदेड इथे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. तर २००४ मध्ये उस्मानाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे (Babasaheb Ambedkar Marathwada University) उपकेंद्र सुरू करण्यात आले आणि आता याच उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा देऊन या विद्यापीठाचे पुन्हा विभाजन करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रशासकिय पातळीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विभाजनासंदर्भात सुरू असलेल्या हालचाली थांबवून या विद्यापीठाचे विभाजित होणार नसल्याचे जाहीर करावे, राज्य सरकारने विभाजनासंदर्भात अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी गठीत केलेली समिती रद्द करण्यात यावी. उस्मानाबाद उपकेंद्राला राज्य शासनाकडून सुविधा पुरवण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

Bamu News
जेडीएसच्या आमदाराचे काँग्रेसला मतदान, म्हणाले - आय लव्ह इट

तसेच जर या मागण्यांबाबत सकरात्मक निर्णय झाला नाही तर आंबेडकरी समुदायाच्या वतीने यापुढे पुन्हा एकदा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते दिनकर ओंकार, रमेशभाई खंडागळे, बाबुराव कदम, गौतम खरात, मिलिंद शेळके, किशोर थोरात , बंडू कांबळे, नागराज गायकवाड, प्रा. सुनील वाकेकर, विजय वाहुळ, अरुण शिरसाठ, प्रकाश इंगळे, कुणाल खरात, संदीप आढाव, सतीश गायकवाड, संदीप जाधव, गुल्लू वाकेकर, जयश्री शिर्के, विनोद बनकर, रमेश वाघ, अमोल खरात, सोनू गायकवाड, विशाल वाहुळ, आदित्य रत्नपारखे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com