खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित, कृषी विभागाचेी कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट वाहन परवाने बनवणाऱ्या दोघांना अटक

जिल्ह्यातील खत विक्री केंद्राने शेतकऱ्यांना जादा दराने विक्री करणे, लिंकिंग करणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, विक्री केंद्र,गोदामात उपलब्ध असलेल्या खताचा साठा याची माहिती भावफलकावर नोंद न करणे इत्यादी प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित, कृषी विभागाचेी कारवाई

उस्मानाबाद : जादा दराने रासायनिक खतांची विक्री केल्याप्रकरणी तीन खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित (Three Fertilizer Sellers Licence Suspended) करण्याची कारवाई करण्यात आली. रासायनिक खताची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास (Agriculture Department) प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथकाने नळदुर्ग व परिसरातील तपासणी केली असता तीन खत विक्रेते जादा दराने विक्री करीत असल्याचे आढळून आले. तिन्ही दुकानांचे परवाने निलंबित केल्याची माहिती परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी दिली आहे. तुळजापूर (Tuljapur) तालुक्यातील श्रावणी ॲग्रो एजन्सीज नळदुर्ग,श्री समर्थ कृषी सेवा केंद्र मुर्टा, संघवी शेती उद्योग नळदुर्ग या खत विक्री केंद्राने खताच्या एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री केल्याचे आढळून आले. त्याअनुषंगाने खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतुदीनुसार तपासणी अहवाल पुढील कारवाईसाठी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद (Osmanabad) यांच्याकडे सादर करण्यात आला होता. (Agriculture Department Suspended Three Fertilizer Sellers Licence In Osmanabad)

हेही वाचा: वैद्यकीय शिक्षणमंत्री महोदय, डाॅक्टर कोरोनाशी झुंज देतोय, करणार का मदत?

त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील खत विक्री केंद्राने शेतकऱ्यांना जादा दराने विक्री करणे, लिंकिंग करणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, विक्री केंद्र,गोदामात उपलब्ध असलेल्या खताचा साठा याची माहिती भावफलकावर नोंद न करणे इत्यादी प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही श्री. घाटगे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धतेबाबत व दराबाबत काही अडचण किंवा तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडुन करण्यात आले आहे.

loading image
go to top