AIMIM agitation: औरंगाबादेत राज्य शासनाविरोधात एमआयएमचे आंदोलन

करोडी येथेच आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ करण्यात यावे, या मागणीसाठी एमआयएम पक्षातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले
Aurangabad
AurangabadAurangabad

औरंगाबाद: जिल्ह्यात करोडी येथे मंजूर केलेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलविल्याच्या निषेधार्थ एमआयएम पक्षातर्फे बुधवारी (ता. २८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी देत कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यासाठी मंजूर केलेले आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ पुण्याला हलविल्यामुळे स्थानिक पातळीवरील आणि मराठवाड्यातील खेळाडूंवर अन्याय होणार आहे. औरंगाबाद शहराने अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू दिले आहेत. असे असताना राज्य सरकार भेदभाव करीत आहे. विद्यापीठ कोरोडी येथेच करण्याचा निर्णय लवकर झाला नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Aurangabad
मराठा क्रांती मोर्चातर्फे पुरग्रस्तांसाठी मदत; नागरिकांना मदतीचे आवाहन

शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी, समीर साजीद यांच्यासह एमआयएमचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिटी चौक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला होता. दरम्यान सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले, की हे आंदोलन विनापरवाना करण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com