कितीही मंत्रिपदे द्या, बंडखोरांना पाडूच; अंबादास दानवे

नवनियुक्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आव्हान
Ambadas danave statement we defeat shiv sena rebel mla politics aurangabad
Ambadas danave statement we defeat shiv sena rebel mla politics aurangabadsakal

औरंगाबाद : जिल्ह्यातील पाच आमदारांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. जिल्ह्याला तुम्ही कितीही मंत्री द्या, या गद्दारांना पुढील निवडणुकीत निवडून येऊ देणार नाही, असे आव्हान विधान परिषदेतील नवनियुक्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी (ता. १०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर बुधवारी त्यांचे शहरात आगमन झाले. यावेळी ते पत्रकारांशी ते म्हणाले, की गेल्या चाळीस दिवसांत राज्यात शेतकरी आत्महत्या झाल्या, अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले; पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष दिले नाही.

जिथे गेले तिथे कार्यकर्त्यांच्या फार्म हाऊसची उद्‍घाटने, पार्ट्याच केल्या. बुलेट ट्रेनसाठी सहा हजार कोटी दिले; पण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. राज्यात महिला अत्याचार वाढले आहेत. सरकारचा धाक नसल्याने हे घडत आहे. विरोधी पक्ष म्हणून, या विषयांवर आवाज उठवणार आहोत, असे दानवे म्हणाले. तत्पूर्वी दानवे यांचे बाबा पेट्रोल पंप आणि क्रांती चौकात जोरदार स्वागत करण्यात आले. शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली.

सत्तारांना शिक्षणमंत्री, राठोडांना महिला बालकल्याणमंत्री करा

महाराष्ट्राची ओळख फुले, शाहू, आंबेडकर म्हणून आहे; पण आता ही ओळख बदलत आहे, असे नमूद करीत मंत्रिमंडळ विस्तारावर दानवे म्हणाले, की अब्दुल सत्तार यांना शिक्षणमंत्री करावे तर संजय राठोड यांना आता महिला व बालकल्याणमंत्री केले पाहिजे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com