औरंगबाद : लाखावर घरांची वीज गुल!

शहरात गुरुवारी तब्बल ३८ फिडरवर भारनियमन
Arrears and power theft homes without electricity aurangabad
Arrears and power theft homes without electricity aurangabadsakal

औरंगबाद : विजेच्या वाढत्या मागणीमुळे शहरातील ज्या भागात थकबाकी आणि वीजचोरी अधिक आहे, अशा ३८ फिडरवर गुरुवारी (ता. ३१) महावितरणला भारनियमन करावे लागले. शहरात एक ते तीन तासांपर्यंत भारनियमन केल्याची माहिती अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांनी दिली. यामुळे शहरातील जवळपास एक लाख ग्राहकांच्या घरात वीज गुल झाली होती. राज्यात विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल साधण्यासाठी तसेच विजेच्या सर्वाधिक मागणीच्या काळात भार व्यवस्थापन करण्यासाठी शहरात भारनियमन करण्यात आले.

महावितरणने वितरण व वाणिज्यिक हानीनुसार वीजवाहिन्यांचे ए, बी, सी, डी, ई, एफ, जी-१, जी-२ व जी-३ असे गट तयार केलेले आहेत. शहरात एकूण १५० फिडर आहेत. त्यापैकी सकाळच्या सत्रात ३२ फिडरवर तर दुपारच्या सत्रात १० फिडरवर लोडशेडिंग करण्यात आले.

औरंगाबाद शहरात गुरुवारी सकाळी ५.३० ते ६.४५, ६ ते ६.४५, ६.१५ ते ६.४५, दुपारी ३ ते ४, ३.३० ते ४.१४, ३.३० ते ३.३० ते ०७ अशा वेगवेगळ्या वेळेत ई ते जी-३ या वीजबिलांची सर्वाधिक थकबाकी असलेल्या पाच गटातील ३८ फिडरवर एक ते तीन तास भारनियमन करण्यात आले. विजेच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे, अन्यथा पुढील काही दिवस भारनियमन अटळ आहे, असे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

भारनियमन केलेले फिडर

११ केव्ही सिटी चौक फिडर, सारा सिद्धी, खंडोबा सातारा, सुधाकरनगर, आयआरबी वाल्मी, दर्गा, मोंढा, निजामोद्दीन, रोषणगेट, मकबरा, पानचक्की, गणेश कॉलनी, रोषणगेट, रंगीन गेट, शिवनेरी, जमन ज्योती, सुभेदारी विश्रामगृह, दिल्ली गेट, भीम टेकडी, भगतसिंगनगर, मिलिंद कॉलेज, राहुलनगर, ग्रोथ सेंटर, दुधडेअरी, टाइम्स कॉलनी, जसवंतपुरा, आझाद चौक, प्रज्ञासाई, दर्गा, देवगिरी, गौतम दालमिल, कौसर पार्क, नाथ ॲग्रो, सारासिद्धी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com