esakal | मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी मुख्य रस्त्यांवर डांबरही आले
sakal

बोलून बातमी शोधा

अंतर्गत रस्त्यांचे हाल

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी मुख्य रस्त्यांवर डांबरही आले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्ताने मुख्यमंत्री शुक्रवारी (ता. १७) शहरात येत असल्याने रस्त्यांचे भाग्य उजळले आहे. मुख्य रस्त्यावर महापालिकेने गेल्या तीन-चार दिवसांपासून पॅचवर्क सुरू केले आहे. काही डांबरी रस्त्यावर कॉंक्रिट टाकले जात होते पण गुरुवारी (ता. १६) डांबरीकरणाच्या माध्यमातून खड्डे बुजविण्यात आले. मुख्य रस्त्यावरी खड्डे बुडले असले तरी अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय आहे.

शहरातील अनेक रस्ते गुळगुळीत झाले असले तरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. जागो जागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त होते. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त या रस्त्यांचे भाग्य उजळले आहे. दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने जळगाव रोडवर पॅचवर्क केले. महापालिकेने देखील दोन दिवसात शहरातील मुख्य रस्त्यावरचे खड्डे बुजविले आहेत. पण अंतर्गत रस्त्यावरील खड्डे कायम आहेत.

हेही वाचा: 'खासदार इम्तियाज जलील यांनी राजकारण करु नये'; पाहा व्हिडिओ

सिद्धार्थ उद्यानात जोरदार तयारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ८.४५ ते ९ या वेळेत सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना देतील. यानंतर ९ वाजता ध्वजवंदन होईल. या कार्यक्रमासाठी महापालिकेने जोरदार तयारी केली आहे. या ठिकाणी आकर्षक रोशणाई, फुलांची सजावट, शामियाना टाकण्यात आला असून नव्याने रंगरंगोटी देखील करण्यात आली आहे. गुरुवारी कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आली. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी देखील गुरुवारी कार्यक्रम स्थळांची पाहणी केली.

loading image
go to top