औरंगाबाद जिल्ह्यात २७ टक्के ओबीसी

ओबीसींचा डेटा समर्पित आयोगाला सादर : संख्या ४ लाख ५९ हजारांवर
Aurangabad 27% OBC Local body elections
Aurangabad 27% OBC Local body electionssakal

औरंगाबाद : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी जिल्ह्यातील ओबीसी डेटा समर्पित आयोगाला सादर करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सादर केलेल्या या अहवालात ओबीसींची संख्या ४ लाख ५९ हजार ५७४ (२७.०२ टक्के) असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक नीलेश गटणे यांनी दिली.

जिल्ह्यात ८६८ ग्रामपंचायती अंतर्गत १७ लाख ४२६ मतदार असून, या मतदार यादीच्या सर्वेनंतर ४ लाख ५९ हजार ५७४ मतदार (२७.०२ टक्के) हे ओबीसी असल्याचे समोर आले आहे. नीलेश गटणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९६२ पासून २०१७ पर्यंत झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत किती उमेदवार रिंगणात होते? त्यापैकी किती उमेदवार निवडून आले? निवडून आलेले उमेदवार आरक्षणाच्या कोणत्या प्रवर्गातील होते? आरक्षणाची पद्धत काय होती? कोणत्या प्रवर्गासाठी किती आरक्षित वॉर्ड होते, याचा तपशील आयोगाने मागविला होता.

तालुक्यातील ओबीसींचे प्रमाण पुढीलप्रमाणे

आकडे टक्केवारीत

  • ४८ वैजापूर

  • २५ औरंगाबाद

  • २७.८५ पैठण

  • २४.१८ सिल्लोड

  • ४२ सोयगाव

  • २३.०४ खुलताबाद

  • २६.११ गंगापूर

  • २१ फुलंब्री

  • ३६.७७ कन्नड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com