औरंगाबाद : बजरंग दलाची निदर्शने

कोल्हे, कन्हैयालाल हत्येचा निषेध
Aurangabad Bajrang Dal Agitation
Aurangabad Bajrang Dal Agitation

औरंगाबाद : अमरावतीमध्ये उमेश कोल्हे आणि राजस्थानमध्ये उदयपूर येथे कन्हैयालाल यांची हत्या झाली. या विरोधात कडक कारवाई करून नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी राष्ट्रीय बजरंग दलाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे कि, काही दिवसांपासून देशात हिंदूंची हत्यांची मालिका सुरु आहे. अशा मानसिकतेच्या हत्याऱ्यांचा शोध घ्या. एक महिनाभरात फास्टट्रक कोर्टात प्रकरण चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. महाराष्ट्रच्या अमरावतीतील उमेश कोल्हे यांची झालेली हत्या अतीशय गंभीर आहे. त्यांच्या कुटूंबियांना ५१ लाख रुपयांची मदत द्यावी, कुटूंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत घेण्यात यावे अशी मागणी अंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या राष्ट्रीय बजरंग दलाकडून करण्यात आली. निवेदनावर सुभाष मोकरिया, किरण सुरे, चंदा राजपूत, ओजस्वीनी, लक्ष्मीकांत कुलकर्णी आदी पदाधिकारींची नावे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com