Aurangabad: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी अर्जुन गाढेंची निवड

Aurangabad dcc bank vice president
Aurangabad dcc bank vice president

औरंगाबाद: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या गुप्त मतदान प्रक्रियामध्ये अब्दुल सत्तर यांचे कट्टर समर्थक अर्जुन गाढे विजय झाले आहेत. अर्जुन गाढे यांना तेरा मते मिळाली तर त्यांच्याविरोधात उभे असलेले कृष्णा पाटील डोणगावकर यांना केवळ सात मते मिळाली.

सात मतांनी अर्जुन गाढे हे विजयी झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी अनिल कुमार दाबशेडे यांनी दिली. निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली होती. यात कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे यांनी मतदान करून निवडणूक प्रक्रियेतून लवकर काढता पाय घेतला होता.

यामुळे हे सर्व जण नाराज असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. मात्र अब्दुल सत्तार यांची बँक ताब्यात घेण्याची खेळी अखेर यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष हे सत्तार गटाचे असल्यामुळे बँक ही सत्तार यांच्या ताब्यात राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com