शेतकरी पती, पत्नीचा धक्कादायक शेवट; शेतातच घेतले दोघांनी विष

गायके दाम्पत्य हे रात्री शेतात पाणी भरण्याच्या निमित्ताने गेले होते.
शेतकरी पती, पत्नीचा धक्कादायक शेवट; शेतातच घेतले दोघांनी विष

जेहूर (जि.औरंगाबाद) : कन्नड तालूक्यातील खामगाव येथील शेतकरी रामेश्वर जगन्नाथ गायके (वय३४) व त्यांची पत्नी आश्विनी रामेश्वर गायके (वय ३०) यांनी त्यांच्या शेतात गुरुवारी (ता.१६) मध्यरात्री शेतात जाऊन विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.१६) सकाळी उघडकीस आली आहे. गायके दाम्पत्य हे रात्री शेतात पाणी भरण्याच्या निमित्ताने गेले होते. रामेश्वर गायके हे सततच्या नापिकीमूळे कर्जबाजारी झाले होते. त्यांना यंदाही म्हणावे तसे उत्पन्न झाले नव्हते. त्यामुळे लोकांचे व बँकेचे कर्ज कसे फेडायचे? या आर्थिक विवंचनेत ते होते. त्यामूळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सूरू आहे.

घटनास्थळी देवगाव रंगारी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचानामा त्यांनी केला आहे. गायके दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी औराळा येथील प्राथमिक आरोग्य पाठविले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की रामेश्वर गायके यांच्यावर बँकेसह खासगी कर्ज होते. सतत नापिकीमुळे ते कर्ज बाजारी बनले होते. असे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकाने दिली आहे. गायके दाम्पत्याच्या पश्चात आईवडील, भाऊ, भावजय, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com