औरंगाबादेत आज तेरा केंद्रांवर लसीकरण राहणार सुरु

शासनाने कोविशिल्ड लसीच्या पहिला व दुसरा डोस मध्ये कमीत कमी ८४ दिवस अंतर असणे आवश्यक केले आहे. त्यानुसार ज्या नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे.
Vaccination
VaccinationSakal

औरंगाबाद : महापालिकेकडे (Aurangabad Municipal Corporation) २ हजार २५० लस शिल्लक आहेत. यामुळे (Corona) आज सोमवारी (ता. १७) १३ केंद्रांवर लसीकरण (Corona Vaccination) सुरू राहणार आहे. यामध्ये सात आरोग्य केंद्रांवर कोविशिल्ड (Covishield) तर सहा केंद्रांमध्ये कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाने कोविशिल्ड लसीच्या पहिला व दुसरा डोस मध्ये कमीत कमी ८४ दिवस अंतर असणे आवश्यक केले आहे. त्यानुसार ज्या नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता त्यांना ८४ दिवस पूर्ण झाल्यावरच दुसरा डोस घेण्यासाठी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावे लागणार आहे. लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाईन वर्कर्ससाठी कोविशिल्ड लसीचा फक्त दुसरा डोस व ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना पहिला व दुसरा डोस उपलब्ध असेल. तसेच आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाईन वर्कर्स व १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी पहिल्या डोससाठी लसीकरण केंद्रावर (Corona Vaccination Site) गर्दी करु नये, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे. (Aurangabad Corona Vaccination Updates Today Vaccination At 13 Sites)

Vaccination
मराठवाड्यात कोरोनाने १०८ जणांचा मृत्यू, तीन हजार ३२६ जणांना नव्याने बाधा

सात आरोग्य केंद्रांवर कोविशिल्ड

महापालिकेकडे कोविशिल्डच्या १ हजार ६१० लस शिल्लक आहेत. या चिकलठाणा, सिल्कमिल काँलनी, बन्सीलालनगर, सिडको एन-८, सिडको एन- ११, शिवाजीनगर, जवाहर कॉलनी आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिल्या आहेत.

कोव्हॅक्सिनची लस इथे मिळेल

महापालिकेकडे कोव्हॅक्सिनच्या ६४० लस शिल्लक आहेत. या चेतनानगर, क्रांतीचौक, गणेश काँलनी, तेली समाज मंगल कार्यालय जुना मोंढा भवानीनगर, राजनगर आरोग्य केंद्र आणि एमआयटी हाँस्पिटल एन-४ या ठिकाणी घेता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com