प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा

रघुनाथ झोपलेला असल्याची खात्री केली , त्यानंतर मित्राने शेडच्या बाजुला पडलेल्या दगडाने व यशोदाने काठीने रघुनाथचा जागीच खून केला...
Aurangabad crime news
Aurangabad crime newsAurangabad crime news

जायकवाडी/बालानगर (औरंगाबाद): पैठण तालुक्यातील बालानगर शिवारात गुरूवारी (ता.१५) उघडकीस आलेल्या घटनेत पत्नीनेच अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बालानगर शिवारातील राधाबाई भाऊसाहेब घोंगडे यांच्या शेतात वाल्मिक सिताराम घोंगडे (रा . बालानगर ता . पैठण ह.मु. खोडेगाव ता . पैठण) हे मशागत करीत असतांना त्यांना एका ठिकाणी काहीतरी पुरल्याचा संशय आला. त्यांनी उकरुन पाहिले असता जमिनीत अंदाजे एक ते दिड फुटावर मानवी हाड आढळून आल्याने त्याबाबत पोलीस पाटील यांना माहिती दिली. पोलीस पाटील यांनी पोलीस ठाणे एमआयडीसी पैठण व स्थानिक गुन्हे शाखेस माहिती दिल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक गोरख भामरे व तहसिलदार पैठण यांना कळविले. या ठिकाणी मानवी हाडाचा सांगाडा मिळून आला.

Aurangabad crime news
Corona Updates: मराठवाड्यात १२३ जणांचा मृत्यू, २४ तासांत सात हजार सातशे रुग्ण

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरु केला. त्यात दत्तात्रय ऊर्फ शिवाजी जगन्नाथ घोंगडे व यशोदा रघुनाथ घोंगडे दोघे रा . बालानगर यांनी मिळून यशोदाचा पती रघुनाथ घोंगडे याचा जानेवारीत खून करुन त्याचा मृतदेह राधाबाई घोंगडे यांचे शेतात खड्डा करुन पुरले आहे, अशी खात्रीलायक माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने दत्तात्रय उर्फ शिवाजी जग्गनाथ घोंगडे वय ४० वर्ष , रा . गट नं . १७ शेतवस्तीवर बालानगर यास ताब्यात घेऊन त्याला खाक्या दाखविला. त्यात त्याने सांगितले की, माझे यशोदासोबत अनैतिक संबंध आहेत, आमच्या संबंधाबाबत रघुनाथला समजले होते. त्यावरुन तो यशोदाला व तिच्या मुलांना नेहमी मारहाण करत असे. त्यामुळे मी व यशोदा अशा दोघांनी मिळून रघुनाथचा खून करायचे ठरविले.

त्यानंतर यावर्षीच्या मकर संक्रातीच्या आठ दिवस अगोदर रघुनाथने यशोदाला मारहाण केली होती. त्याचदिवशी मी रात्री रघुनाथला त्याच्या घरुन माझ्या शेतातील फिल्टर प्लॅंटवर झोपण्यासाठी घेऊन आलो. रघुनाथ झोपलेला असतांना मी यशोदाला फोन करुन तिला घेऊन शेतात आलो. आम्ही दोघांनी रघुनाथ झोपलेला असल्याची खात्री केली , त्यानंतर मी शेडच्या बाजुला पडलेल्या दगडाने व यशोदाने काठीने रघुनाथचा जागीच खून केला. मृतदेह ओढत नेऊन राधाबाईच्या शेतात टिकाव व फावडयाने खड्डा करुन पुरला, अशी कबुली त्याने दिली.

Aurangabad crime news
Corona Updates: चिंताजनक! बीडमध्ये पुन्हा रुग्णसंख्या हजारी पार

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशोदाची चौकशी केली असता तिनेही अशीच कबुली दिली. दोन्ही आरोपींना तपासकामी पोलीस ठाणे एमआयडीसी पैठण यांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपनिरिक्षक संदीप सोळंके , पोहेकॉ प्रमोद खांडेभराड , किरण गोरे, संजय भोसले, पोकॉ संजय तांदळे, पद्मा देवरे, बिट जमादार राजु जावळे, विजय मोरे, राहुल बचके,खंडु मंचरे, राहुल मोतमल यांनी ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दहा हजारांचे बक्षिस जाहीर केले आहे.

आधी उडवाउडवी, नंतर दिली कबुली-

'बालानगर येथील एकजण बेपत्ता असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याच्या पत्नीला पुरलेला मृतदेह ओळखीचा आहे का असे विचारले असता तीने उडवा उडवीचे उत्तरे दिली. तिला पोलिसी खाक्या दाखवताच तिने हा मृतदेह तिच्या पतीचा असल्याचे कबूल केले. तसेच अनैतिक संबंधातून गुन्हा केल्याची कबुली सहाय्यक पोलीस अधीक्षक गोरख भांबरे यांच्यासमोर दिली.'

-अर्चना पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com