डॉक्टरची आत्महत्या, चिमुकला आईच्या मायेला मुकला

सकाळी डॉक्टर दांपत्यामध्ये घरातील किरकोळ कारणावरुन वाद झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
नेरुळमधील एकाची नैराश्‍येतून आत्महत्या
नेरुळमधील एकाची नैराश्‍येतून आत्महत्या

औरंगाबाद : घरगुती किरकोळ कारणावरुन घाटीच्या दंत रुग्णालयातील डॉक्टरने मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. प्रियांका प्रमोद क्षीरसागर (२७, रा. कांचनवाडी) असे त्यांचे नाव आहे. तसेच आपल्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही, असेही सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. घाटीच्या दंत रुग्णालयातील डॉ. प्रियांका क्षीरसागर यांचे डॉ. पती प्रमोद हेदेखील घाटीतच कार्यरत आहेत. या दोघांचा गेल्या पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मंगळवारी सकाळी डॉक्टर दांपत्यामध्ये घरातील किरकोळ कारणावरुन वाद झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, याच कारणातून डॉ. प्रियांका यांनी दुपारी बाराच्या सुमारास बेडरुममधील फॅनला दोरीने गळफास घेतला. हा प्रकार समोर आल्यावर डॉ. प्रमोद यांनी सातारा पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली. पोलिस दाखल होईपर्यंत प्रियांका यांना बेशुध्द अवस्थेत फासावरुन खाली उतरविण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी प्रियांका यांना तात्काळ घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रियांका यांच्या पश्चात पती आणि अडीच वर्षांचा मुलगा असल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली.

पोलिसांनी प्रियांका यांनी लिहीलेली सुसाईड नोट हस्तगत केली आहे. त्यामध्ये प्रियांका यांनी आपल्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरु नये असे म्हटले आहे. सासरच्या मंडळींनीही प्रियांकाच्या मृत्यूसंदर्भात कोणताही आक्षेप घेतला नसून आपला जावई चांगला असल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे तपास अधिकारी तथा उपनिरीक्षक विक्रम वडणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com