‘माझं तिच्यावर खूप प्रेम होतं, पण तिने दुसऱ्याचं ऐकून धोका दिला’

प्रेयसीही दुसऱ्या मुलांचे ऐकते, मला टेन्शन देते याचे सर्व पुरावे मोबाईलमध्ये आहेत.
‘माझं तिच्यावर खूप प्रेम होतं, पण तिने दुसऱ्याचं ऐकून धोका दिला’

औरंगाबाद : ‘माझं तिच्यावर खूप प्रेम होतं, पण तिने दुसऱ्याचं ऐकून मला धोका दिला’ अशा आशयाची सुसाईड नोट लिहून ती व्हाॅट्सअॅप स्टेटसला ठेवत त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक मंगळवारी (ता.१३) रात्री साडेसात दरम्यान समोर आली. ही घटना नक्षत्रवाडीतील स्मशानभूमीतील विहिरीत उघडकीस आला. आकाश रावसाहेब कोळेकर (२०, रा. नक्षत्रवाडी) असे मृताचे नाव आहे.

आकाशने सुसाईड नोट लिहिली. त्यानुसार आकाशचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते, दरम्यान मुलीने दुसऱ्या मुलांचे ऐकून त्याच्याशी प्रेमसंबंध तोडल्याचा संशय आकाशला होता. यातून त्याने स्वतःला संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये संबंधित प्रेयसीही दुसऱ्या मुलांचे ऐकते, मला टेन्शन देते याचे सर्व पुरावे मोबाईलमध्ये आहेत, तसेच तिच्या ओळखीच्या चार मुलांनी आपणास त्या मुलीला बोलशील तर मारुन टाकू, अशी धमकी दिल्यानेही आपणास टेन्शन आल्याचे म्हटले आहे. त्या मुलांच्याही नावांचा त्यात उल्लेख करत कोणालाही सोडू नका असेही म्हटले आहे. त्याने सुसाईड नोट लिहून ती व्हाॅटसअॅपला अपडेट केल्यानंतर विहिरीत उडी घेतली. यादरम्यान तो मोठ्याने ओरडला. दरम्यान, अग्निशमन दलाचे एच. वाय. घुगे, परेश दुधे, शशीकांत गिते, अशोक पोटे, सचिन शिंदे, मनोज राठोड यांनी तात्काळ विहिरीच्या दिशेने धाव घेत आकाशचा मृतदेह बाहेर काढला. त्याच्या आकस्मिक मृत्यूची नोंद सातारा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलिस दखल घेईनात, थेट आयुक्तांना भेटावे लागले

मृत आकाशचे वडील, नातेवाईक यांच्यासह त्याचे मित्र सातारा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. मात्र पोलिसांनी दखल न घेता अंत्यविधी करुन घ्या नंतर तक्रार घेऊ अशी भूमिका घेतली. यावर नातेवाईकांनी तक्रार घेईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा घेतला असता ‘तुमच्यावर १४४ कलमानुसार कारवाई करु, असा दम देत आम्हाला हाकलून लावल्याचे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. मृत आकाशचे सकाळी दहा साडेदहा वाजता शवविच्छेदन केले. नातेवाईक मित्रांनी उस्मानपुरा येथे आलेल्या आयुक्तांना भेटून आपबीती कथन केल्यानंतर निरीक्षकांनी गुन्हा दाखल करुन घेतला. त्यानंतर रात्री आठदरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com