अनैतिक संबंधात पती अडसर,प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा

पत्नीने प्रियकराच्या मदतीने आणखी दोघांना पतीच्या खुनाची चक्क सुपारीच दिली.
murder
murderesakal

औरंगाबाद : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खुन करुन ओळखू येऊ नये म्हणून पुलाखाली टाकल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात पत्नीसह प्रियकरात गुन्हा दाखल करुन पत्नीला अटक करण्यात आली आहे. मात्र आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून पत्नीने प्रियकराच्या मदतीने आणखी दोघांना पतीच्या खुनाची चक्क सुपारीच दिल्याचे पोलिस तपासात (Crime In Aurangabad) उघड झाले आहे. रामचंद्र रमेश जायभाये (रा.कुंभेफळ, जि. बुलढाणा, सध्या रा. आईसाहेब नगर, पिसादेवी रस्ता, हर्सूल) असे खून केलेल्या पतीचे नाव असून मनिषा जायभाये असे पत्नीचे नाव आहे. तर गणेश रघूनाथ फरकाडे (रा. बनकिन्होळ, ता. सिल्लोड) असे त्या पत्नीच्या (Aurangabad) प्रियकराचे नाव आहे.

murder
औरंगाबादेत मोठा अपघात ! दोन ऊसतोड मजूर ठार, पाच गंभीर जखमी

या प्रकरणी मृत रामचंद्र जायभाये यांचा लहान भाऊ कृष्णा यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांना सदर प्रकरणात खून झाल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याअनुषंगाने तपास करण्यास सुरवात केली होती. दरम्यान पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने केल्याचे समोर आले होते. पोलिस तपासादरम्यान प्रियकर फरकाडे याने आणखी दोघांना सुपारी दिली होती. राहुल सावंत (रा.सातारा परिसर), निकीतेश मगरे (रा. बालाजीनगर) अशी सुपारी दिलेल्या संशयित आरोपींची नावे असून या दोघांसह पत्नी मनिषा आणि तिचा प्रियकर गणेश फरकाडे अशा चौघांनी मिळून हा खून केला असून सुपारी घेतलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com