औरंगाबाद : पेट्रोल कंपन्यांतर्फे जिल्ह्यात डिझेलचा कृत्रिम तुटवडा

पंपचालकांचा आरोप ः नियमित पुरवठा करण्याची मागणी
Aurangabad diesel shortage Pump Operator Demand for regular supply
Aurangabad diesel shortage Pump Operator Demand for regular supplysakal

औरंगाबाद : राज्यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनतर्फे (बीपीसीएल) डिझेलचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. यामुळे नगर,नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. या कंपनीने नियमीतपणे डिझेलचा पुरवठा करावा अशी मागणी बीपीसीएलच्या डिलरतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

या संदर्भात पेट्रोलपंप चालक राहुल पवार म्हणाले की, एक मेपासून जिल्ह्यात डिझेलची कमतरता भासत आहे. स्टॉक नसल्याचे कंपनीतर्फे एकीकीडे सांगत असताना दुसरीकडे कंपनीचा वाळूज आणि शेंद्रा येथील दोन्ही पंपाना मात्र वेळेत पाहीजे तेवढे डिझेलाचा पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील बीपीसीएलच्या ५० पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. डिझेल नसल्याने अनेक पंप ड्राय झाले आहेत.

सध्या खरीपाची तयारी शेतकरी टॅक्ट्ररच्या माध्यमातून करीत आहेत. मात्र, डिझेलचा तुटवडा नसल्याने शेतकरीच अडचणीत सापडला आहे. पेट्रोल मागे १० ते १२ आणि डिझेल मागे २० ते २५ रुपये लॉस येत असल्यामुळे ही कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येत असल्याचा आरोपही पवार यांनी केला. जिल्ह्याला ७ लाख लिटर पेट्रोल रोज लागते. बीपीसीएलच्या जिल्ह्यातील पंपाना रोज दोन लाखहून अधिल लिटरचे डिझेल लागते. मात्र कंपनीतर्फे ५० पंपासाठी केवळ ९५ हजार लिटर डिझेल पाठविण्यात आले आहे.

१०० टक्के डिझेल लागणाऱ्या पंपाना केवळ २५ ते ३० टक्केच इंधन देण्यात येत आहे. यामुळे कंपनीतर्फे कोणत्या पेट्रोल पंपावर किती डिझेलचा साठा राहील हे जाहिर करावेत. यामुळे शेतकऱ्यांची अडचण निर्माण होणार नाही, असेही पवार यांनी सांगितले. यावेळी वैजापूर येथील पंपचालक आनंद बोडखे, शेख हबीब, दिग्विजय भोसले, मनिष पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com