औरंगाबाद : जिल्हा न्यायालयातील १७ 'न्यायाधीशांच्या' बदल्या

जिल्हा न्‍यायाधीश एस. डी. टेकाळे यांना निवृत्तीबद्दल निरोप
Aurangabad district court seventeen judge Transfer
Aurangabad district court seventeen judge Transfersakal

औरंगाबाद : जिल्ह्यातील १७ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. याबद्दल बदली झालेल्या न्यायधीशांसह प्रधान जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस. डी. टेकाळे यांना सेवानिवृत्तीबद्दल भावपूर्ण निरोप देण्‍यात आला. जिल्हा सरकारी वकील व लोक अभियोक्ता कार्यालयातर्फे मंगळवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एम. एस. देशपांडे आणि एस. एस. भिष्‍मा यांनी प्रतिनिधीक मनोगत व्‍यक्त केले.

प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मुख्य जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे तसेच सरकारी अभियोक्ता एस. जी. मुप्पिडवार यांची उपस्थिती होती. प्रस्ताविक अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी केले. सहायक सरकारी वकील अॅड. मधुकर आहेर यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सुदेश शिरसाठ यांनी न्‍यायाधीश एस. डी. टेकाळे यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. अॅड. धनंजय वाकणकर यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश के. आर. चौधरी, एस. के. कुलकर्णी, एस. एस. देशपांडे, एस. जे. रामगडिया, व्ही. बी. पारगावकर, एस. एम. आगरकर तसेच दिवाणी न्यायाधीश आर. एम. तुवर, ए. एस. पंडागळे, एस. एन. मोरवाले तसेच सरकारी वकील के. एन. पवार, डी. के. नागुला, अरविंद बागुल, शरद बांगर, बी. आर. लोया, आर. एस. पहाडिया, आर. सी. कुलकर्णी, व्ही. के. कोटेचा, एस. एस. बर्वे, एन. एन. पवार, एस. एम. सोनटक्के, ए. बी. येगावकर, डी. ए. वाकणकर, एम. एम. अदवंत, ए. बी. करंडे, एस. बी. सूर्यवंशी व बी. एन. आढावे आदींची उपस्थिती होती.

बदली झालेले न्‍यायाधीश

जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस. एस. भिष्‍मा, एस. जी. गिरधारी, टी. जी. मिटकरी, आर. एस. निंबाळकर, व्‍ही. पी. कदम, एम. एस. देशपांडे, ए. ए. कुलकर्णी, ए. आर. कुरेशी, एम. ए. मोटे, मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी एस. डी. कुर्हेकर, दिवाणी न्‍यायाधीश (व.स्‍त) पी. आर. शिंदे, जे. एम. अंबोडकर, एन. व्‍ही. बन्‍सल, आर. एन. बन्‍सल, पी. एस. कुलकर्णी, आय. के. सूर्यवंशी, के. आय. खान.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com