औरंगाबाद : नशेच्या गोळ्यांचा चा साठा जप्‍त

नशेच्या गोळ्या करून विकणारे दोघे अटकेत; लातूर, परभणीतून आणायचे शहरात
Aurangabad drug pills Stocks seized two smugglers arrested
Aurangabad drug pills Stocks seized two smugglers arrestedesakal

औरंगाबाद : शहानूरमियॉं चौकात अवैधरीत्या नशेच्या गोळ्या (बटन) विक्री करणाऱ्या राम धोंडू काळे (वय ४५) आणि एपीआय कॉर्नरजवळील ठाकरेनगर भागात राहत्या घरातून नशेच्या औषधींची मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्या दिनेश साहेबराव हावळे (५८) या दोघांना ‘एनडीपीएस’च्‍या विशेष पथकाने गुरुवारी पहाटे बेड्या ठोकल्या. दोघा आरोपींकडून पथकाने तब्बल ६०० नशेच्या गोळ्या जप्त केलेल्या आहेत.

शहर पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेंतर्गत असलेल्या अमली पदार्थविरोधी कृती पथकाने (एनडीपीएस) ही कारवाई केली. माहितीनुसार, एनडीपीएसच्या पथकाला शहानूरमियॉं दर्गा चौकाच्या परिसरात नशेच्या औषधी विक्री होत असल्याची माहिती मिळाली. माहिती आधारे पथकाने राम धोंडू काळे (४२, रा. न्यु,उस्मानपुरा, श्रेयनगर) याला अटक केली. त्याच्याकडून पथकाला ४५ नायट्रोसनच्या नशेच्या गोळ्या जप्त केल्‍या.

राम काळे याला गोळ्या कोठून आणल्या याबाबत विचारणा केली असता, त्याने दीपक साहेबराव हावळे (५८, रा. एपीआय कॉर्नर, भवानी पेट्रोल पंपजवळ, ठाकरे नगर) याच्याकडून या गोळ्या खरेदी केल्याची माहिती दिली. त्‍यानुसार पथकाने दीपक साहेबराव हावळे याच्या घरावर छापा मारला. त्याच्या ताब्यातून ५५५ नग नायट्रोसन १० च्या गोळ्या व ४८० रुपये रोख रकमेसह एक धारदार हत्यार जप्त केले. दीपक हावळे हा (एमएच-२०-एफयू-८०८६) या चार चाकी वाहनातून नशेचा व्यापार करीत होता. प्रकरणात एनडीपीएसचे सहायक फौजदार नंदकुमार भंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपींना १३ जूनपर्यंत कोठडी

आरोपींना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी आरोपींनी जप्‍त करण्‍यात आलेल्या गोळ्या कोठून, कोणाकडून खेरदी केल्या व कोणाला विक्री करणार होते. तसेच हावळे याच्‍याकडे सापडलेली चारचाकी वाहन कोणाच्‍या मालकीची आहे तसेच सुरा बाळगण्‍याचा नेमका उद्देश काय होता. आरोपीच्‍या घरातून सापडलेल्या शरयू हॉस्पिटलच्या लेटरपॅड बाबत तपास करायचा आहे. तसेच आरोपीने लातुर, परभणी येथील मेडिकलवरून गोळ्या आणल्याचे सांगितले आहे, त्‍याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

हावळेकडे सापडले डॉक्टरचे ‘लेटर हेड’!

शहरात नशेच्या औषधींची विक्री करणाऱ्या दीपक हावळे याला ताब्यात घेऊन एनडीपीएसच्या पथकाने अधिक तपास केला असता, दीपक हावळे याच्या जवळून एका डॉक्टराचे लेटर हेडही सापडले आहे. हावळे हा परभणी येथील ओळखीच्या महिलेच्या नावे असलेल्या व परभणीतील सेलू येथील डॉक्टरच्या लेटर पॅडवर नशेच्या गोळ्या लातूर, परभणी तसेच अन्य वेगवेगळ्या मेडीकल दुकानातून खरेदी करीत होता. औरंगाबादेत या नशेच्या गो‌ळ्या चढत्या भावाने विक्री करीत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com