Aurangabad : औरंगाबाद दूध संघाच्या निवडणुकीसाठी ९ हरकती

औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे.
Aurangabad Dudh Sangh Election
Aurangabad Dudh Sangh Election esakal

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संस्थेची निवडणूक (Aurangabad District Cooperative Dudh Federation Election) प्रक्रिया सुरु झाली आहे. यात निवडणुकीसाठी प्रत्येक संस्थेकडून ठराव मागविण्यात आला होता. त्या ठरावाच्या विरोधात आणि सभासद मतदार यादीच्या विरोधात हरकती मागविण्यात आल्या होती. त्यात सोमवारपर्यंत (ता.२९) ९ हरकती दाखल झाल्या आहेत. त्यातील सर्वाधिक हरकती या खुलताबाद (Khultabad) तालुक्यातील असून सर्वांचे मंगळवारपासून (ता.३०) म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय उपनिबंधक संस्थेचे (दुग्ध व मत्स ) देविदास पालोदकर यांनी दिली. जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रियेचाच (Aurangabad Dudh Sangh Nivadnuk) भाग असलेल्या सभासदांची यादी आणि तालुकास्तरीय संस्थाकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. २६ नोव्हेंबरपासून हरकती येण्यास सुरुवात झाली. यात प्रामुख्याने नावातील दुरुस्ती, नाव सामाविष्ट करणे, तालुक्यातील सभासद नसलेल्या व्यक्तींचे नावे, संस्थेची नावे या संदर्भातील या हरकती आलेल्या आहेत. यावर सुनावणी होऊन ६ डिसेंबरला याबाबत निकाल दिला जाईल, असेही जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले. (Aurangabad)

Aurangabad Dudh Sangh Election
मलकापूर बँकेचे तब्बल ७० टक्के कर्ज एनपीए! खातेदार मागतायत पैसे

बिनविरोध होण्याच्या दिशेने हालचाली

दूध संघाच्या संचालक मंडळाची आतापर्यंत बिनविरोध निवड झालेली आहेत. आताही ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काहीजण प्रयत्न करणार आहेत. या संदर्भातील हालचाली सुरु आहेत. दूध संघाच्या हरकतींची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर याला वेग येण्याची शक्यता आहे. यामुळे यावेळीही ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्हा दूध संघातर्फे या सभासद याद्या आणि ठराव मागविण्यात आले होते. त्याविरोधात नऊ हरकती आल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक हरकती या खुलताबाद तालुक्यातील आहेत. आमच्याकडे आलेले हरकतींची माहिती आम्ही डीडीआरकडे कळविली आहे.

डॉ.पी..बी. पाटील, व्यवस्थापकीय संचालक, दूध संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com