औरंगाबाद : दुबई रिटर्न तरुणाच्या कुटुंबीयांचा अहवाल प्राप्त

आई, वडील आणि पत्नी निघाले निगेटिव्ह
Omicron variant
Omicron variantSakal media

औरंगाबाद : दुबईला(dubai) मित्रांसोबत गेलेला आणि कोरोनाबाधित(corona positive) झालेल्या सिडको (cidco)एन-७ भागातील तरुणाच्या आई, वडील आणि पत्नीचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे. या तिघांचेही अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. सिडको एन ७ परिसरातील ३३ वर्षीय तरुण हा मित्रांसोबत दुबईला गेला होता. दुबई येथून १६ डिसेंबरला तो शहरात आला. त्याला सर्दी, ताप असल्याने त्याने दुसऱ्या दिवशी कोरोना चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह निघाला. त्याच्या घरात आई, वडील, पत्नी, लहान मुलं असल्याने त्यांच्या संपर्कात न येताच तो तातडीने एका खासगी रुग्णालयात (private hospital)दाखल झाला.

२३ डिसेंबर रोजी तो खासगी रुग्णालयातून सुटी घेऊन घरातच विलगीकरण कक्षात राहिला. शनिवारी त्याच्या जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या मध्ये कोणतेही लक्षणे दिसून येत नसले तरी त्यास तातडीने मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्या तरुणाच्या घरातील आई, वडील आणि पत्नीची महापालिकेच्या पथकाने कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केली. या चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

Omicron variant
गणपतीपुळेत ३४ हजारांवर पर्यटक; पर्यटकांची सागरी क्रीडांना पसंती

दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका नामंकित शाळेतील शिक्षक गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे शाळेने तातडीने ३५२ विद्यार्थ्यांची महापालिकेच्या पथकाने कोरोना चाचणी केली होती. या सर्व विद्यार्थ्यांचा कोरोना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com