
औरंगाबाद : गुटख्यासह ५२ लाखांचा ऐवज जप्त
औरंगाबाद : चोरटी विक्री करण्यासाठी नेण्यात येत असलेल्या गुटख्यासह तब्बल ५२ लाख १५ हजार २०० रुपयांचा ऐवज फर्दापूर पोलिसांनी सापळा रचून जप्त केला. ही कारवाई ६ मे रोजी सायंकाळी सात वाजेदरम्यान जळगाव - औरंगाबाद रस्त्यावर कन्हैया कुंज हॉटेलजवळ केली.
याप्रकरणी फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक देविदास वाघमोडे यांना सदर रस्त्याने अवैध रित्या गुटखा विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन वाघमोडे यांनी पथकासह सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार संशयित आयशर कंटेनरला अडवून चौकशी केली असता, चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान ‘पोलिसी खाक्या’ दाखविताच चालक हमीद हरूण खॉ (३५, रा.नखरोला जि.पलवल, हरियाणा) आपण आयशरमध्ये (एचआर ७३ ए २२३६) दिल्ली येथून सोलापुरकडे गुटखा घेऊन जात असल्याची जास्त असल्याची कबुली पोलिसांना दिली.
पोलिसांनी ३७ लाख १५ हजार २०० रुपयांचा गुटखा आणि १५ लाख रुपये किंमतीचा आयशर कंटेनर असा एकूण ५२ लाख १५ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी खॉ विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, सिल्लोड उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विजयकुमार मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक देविदास वाघमोडे, अंमलदार सचिन काळे, योगेश कोळी, प्रदिप बेदरकर यांच्या पथकाने केली आहे.
Web Title: Aurangabad Fardapur Police Seized 52 Lakh Gutkha Smuggler Arrested
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..