औरंगाबाद : वनविभागाच्‍या बदल्यांसाठी ‘जोरबैठका’

मलिदा लाटणारा भाग मिळण्यासाठी वनविभागात कंबर कसून प्रयत्न
Aurangabad forest rangers transfers Meetings from 16May
Aurangabad forest rangers transfers Meetings from 16Maysakal

औरंगाबाद : वनविभागाच्‍या प्रादेशिक कार्यालयात सध्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. विभागात आपल्याला मलिदा मिळवून देणारे परिक्षेत्र मिळावे यासाठी अनेकांचा प्रयत्न सुरु आहे. यात वनरक्षक, वनपाल आणि वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी चांगलीच फिल्डिंग लावली आहे. गेल्या आठवड्यापासून बदल्यांच्या हालचाली सुरु आहेत. गुरवारीही दुपारपासून ते सायंकाळपर्यंत यासाठी ‘जोरबैठका’ सुरू होत्या.

वनविभागातर्फे गेल्या १६ मेपासून बदल्यांसंदर्भात बैठका सुरु आहेत. यात २० मेपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. तसेच २३ व २४ मे रोजी अर्ज केलेल्यांना बदलीचे ठिकाण निवडण्याचा पर्याय व समुपदेशन करण्यात आले. आता शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत बदली झालेल्यांची ऑर्डर निघणार आसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. अनेकांनी मलिदी मिळणाऱ्या परिक्षेत्रासाठी फिल्डिंग लावली. यात अधिकाऱ्यांच्या मर्जीतील लोकांना ही ठिकाणे मिळणार आहेत. यामुळे या अधिकाऱ्यांचे आता ‘अच्छे दिन’ येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हिवरखेड प्रकरणातील अधिकाऱ्यांची बदली थांबवा

कन्नड परिक्षेत्रातील हिवरखेड येथून चंदन आणि मौल्यवान दगडांची चोरी झाली. हे सर्व वन परिक्षेत्र अधिकारी शेळके आणि औरंगाबाद येथील त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झाले. त्या अधिकाऱ्याने हिंगोलीसाठी बदलीचा अर्ज केला आहे. चंदनचोर सापडेपर्यंत श्री. शेळके यांची बदली थांबविण्यात यावी, त्याच्यासह उपवन्यजीव संरक्षक नाळे, यासंबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी बुलंद छावा मराठा युवा परिषदेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात शुक्रवारी मुख्य वनसंरक्षक गुजर यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती छावाचे प्रदेश सचिव सुरेश वाकडे पाटील यांनी दिली.

महिला कर्मचाऱ्याला माकडाने घेतला चावा

वनविभागाच्या प्रादेशिक कार्यालयात कार्यरत असलेल्या पुष्पा काथार या महिलेला गुरुवारी दुपारी माकडाने पायाला चावा घेत जखमी केले. घटनेनंतर इतर वनरक्षकांनी त्या माकडाला खोलीत कोंडून ठेवले. जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले. हे माकड गोंधळ घालत असल्यामुळे त्याला पकडून वन विभागाच्या कार्यालयात ठेवले होते. जखमी झालेल्या महिलेने सांगितले की, बुधवारी त्या माकडाला पेरु खायला दिले. त्यावेळी माकडाने आज अचानकपणे हल्ला करीत चावा घेतला. दरम्यान, त्या माकडाला पकडून त्याच्या अधिवासात सोडण्यात आले, असे वन विभागातर्फे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com