औरंगाबाद : गंगापूर उपसा सिंचन योजनेतून २६२ गावे होणार टंचाईमुक्त

आमदार प्रशांत बंब : ८७८ कोटींतून साकारणार ‘हर घर नल’ योजना
har ghar nal
har ghar nalsakal

औरंगाबाद : पाण्यासाठी अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या कामामुळे गंगापूर तालुक्यातील २१० गावे, ५२ वाड्या व वस्त्यांसह २६२ गावांना कायमस्वरूपी व शाश्वत पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हर घर जल या संकल्पनेतून जल जीवन मिशन योजने अंतर्गत ८७८ कोटींची ही पाणी पुरवठा योजना राबवणार आहे. याची निविदाही काढण्यात आल्या असून दोन वर्षांत ही योजना पूर्ण होणार असल्याची असल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

आमदार बंब म्हणाले, की अवर्षण प्रवण व टँकरग्रस्त गंगापूर तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी आतापर्यंत अनेक योजना राबविण्यात आल्या. मात्र, टेंभापूरी, शिरेगाव, नांदूर- मधमेश्वर सारख्या पाण्याचा पुरेसा व शाश्वत उद्भव नसणाऱ्या धरणांतून या योजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. उन्हाळ्यात या धरणांतील पाणीसाठा संपुष्टात येत असल्याने या योजना यशस्वी झाल्या नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी ‘जलजीवन मिशन’ची घोषणा केल्यानंतर गंगापूर तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून एकच शाश्वत ग्रीड पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेण्यासाठी आपण प्रयत्न केले.

१२५३ चौरस किलोमीटर .मी. क्षेत्रफळाच्या तालुक्याचे मुंबई येथील टंडन अर्बन सोल्यूशन्स कंपनीकडून ३० दिवसांत ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अंदाजपत्रके तयार करून निविदा मागविण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात पहिल्यांदाच ड्रोनने हे सर्वेक्षण केले गेल्याचा दावाही आमदार बंब यांनी केला आहे. खुलताबाद तालुक्यासाठीदेखील जायकवाडी धरणातून जलजीवन मिशन योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांना सांगितले.

योजनेसाठी सोलार ऊर्जेचा वापर

या योजनेत एकूण १२ संतुलन टाक्यांद्वारे संपूर्ण तालुक्यातील २१० गांवे व २६२ वाड्या, वस्ती यांच्या उंच जलकुंभापर्यंत पंपाद्वारे पाणी पोचविण्यात येणार आहे. वीज बिलात बचत व्हावी, म्हणून अमळनेर परिसरात सोलर ऊर्जा निर्मिती प्रकल्प घेण्यात येणार आहे. तर २० टक्के महावितरण यांच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचे नियोजन आहे.योजनेसाठी टेंडर प्रक्रिया सुरु आहे. दोनच निविदा आल्याने त्यास २२ जूनपर्यंत मुदत वाढ मिळाली आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल,अशी अपेक्षाही आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com