Aurangabad : भुमरे की सावे? कुणाची लागणार वर्णी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Guardian Minister post

Aurangabad : भुमरे की सावे? कुणाची लागणार वर्णी

औरंगाबाद : राज्याच्या सत्तांतरात औरंगाबादची महत्त्वाची भूमिका राहिली. याचे फळही जिल्ह्याला तीन कॅबिनेटमंत्र्यांच्या रूपाने मिळाले आहे. एवढेच नव्हे तर चांगली खातीही देण्यात आली. हे सगळे झाले तरी जिल्ह्याचा कारभारी अजूनही ठरलेला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळावे यासाठी भाजप आणि शिंदे गटात चांगलीच चुरस दिसून येत आहे.

यात शिंदे गटाकडून रोहयोमंत्री संदीपान भुमरे आणि भाजपकडून सहकारमंत्री अतुल सावे यांचे नाव चर्चेत आहे. दोन्ही पक्षाकडून दावेदारी होत असली तरी या दोघांना पालकमंत्रिपद मिळणार की, पुन्हा पूर्वीसारखे बाहेरचा मंत्री लादणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जिल्हात शिवसेनेचे सहा आमदार आहेत. त्यापैकी पाच आमदार हे शिंदे गटात सामील झाले आहे. यामुळे सत्तांतरात जिल्ह्याचा सहभाग मोठा आहे.

याच दाव्यावर शिंदे गट पालकमंत्रिपदासाठी धडपड करीत आहे. यात रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे सातत्याने मागणी केली जात आहे. दुसरीकडे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडूनही वरिष्ठ पातळीवरून फिल्डिंग लावली जात आहे. मात्र औरंगाबाद लोकसभा आणि महापालिका ताब्यात घेण्यासाठी पालकमंत्रिपद मिळवणे गरजचे आहे.

यामुळे शेवटच्या टप्प्यात जिल्ह्याचा कारभार हा सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे जाणार असल्याची चर्चाही सुरू आहे. येत्या आठवड्याभरात शहरातील कारभारी ठरणार असल्याची माहितीही विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

Web Title: Aurangabad Guardian Minister Post Shinde Group Sandipan Bhumre Atul Save Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..