
औरंगाबाद : एकाच वेळी इंधन आणि इलेक्ट्रीक चार्जिंगवर चालणारी हायब्रीड चारचाकी वाहन होंडाने बाजारात दाखल केली आहे. नवीन पद्धतीचे सेल्फ-चार्जिंग होणारी, तसेच टू-मोटर स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रीक सिस्टीम आणि इंधनावर २६.५ किलोमीटरचे मायलेज देणारी न्यू सिटी इःएचइव्ही’ भारतीय बाजारात दाखल झाली आहे.
होंडा कार्स इंडिया लिमिटेडने स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रीक टेक्नॉलॉजी सह समृद्ध मेनस्ट्रीम सेगमेंट मधील ही पहिलीच कार लॉन्च केली आहे. सिटी इःएचव्हीचे फीचर्स म्हणजे होंडाचे निराळे सेल्फ-चार्जिंग आणि उच्च कार्यक्षम टू मोटर इलेक्ट्रीक हायब्रीड सिस्टीम आहे. होंडा कार्स इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ताकुया सुमुरा म्हणाले.
"आम्ही न्यू सिटी इःएचईव्हीची सुरवात करून भारतात आमच्या इलेक्ट्रीफिकेशनच्या प्रवासाला सुरवात करत आहोत.देशात सर्वोत्तम आणि अर्थपूर्ण तंत्रज्ञान आणण्याच्या आमच्या वचनबद्धतेची खात्री करत आहोत. हे बाजारात उपलब्ध असलेला सर्वात व्यावहारिक (प्रत्यक्ष) उपाय आहे आणि ग्राहकांना इलेक्ट्रीफाइड भविष्याकडे सुरळीत बदल करण्यात मदत करेल.’’
अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली
प्रगत इंटेलिजंट सेफ्टी टेक्नॉलॉजी अर्थात होंडा सेन्सिंग समोरचा रस्ता स्कॅन करण्यासाठी आणि अपघाताचा धोका कमी करण्यासाठी चालकाला सतर्क करते.
कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टम, अडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, रोड डिपार्चर मिटिगेशन, लेन कीपिंग असिस्ट सिस्टम आणि ऑटो हाय-बीम ही होंडा सेन्सिंगची प्रमुख वैशिष्ट्य