औरंगाबाद : शैक्षणिक साहित्य महागले

आधीच त्रस्त असलेल्या पालकांच्या खर्चात होणार वाढ
Aurangabad Educational materials rate hike
Aurangabad Educational materials rate hikesakal

औरंगाबाद : आधीच वाढलेल्या महागाईमुळे घरखर्च वाढलेला आहे. त्यातच आता मुलांच्या शिक्षणाचा खर्चदेखील वाढणार असल्याने पालकांच्या खर्चात भर पडणार आहे. पेपर, पुठ्ठे, प्लास्टिक महागले. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरामुळे ट्रान्सपोर्टचा खर्च वाढला आहे. परिणामी शैक्षणिक साहित्य महागल्याने पालकांच्या खर्चात वाढ झाली आहे.

दोन वर्षानंतर वह्या, पुस्तके, पेनसह शैक्षणिक साहित्याच्या दराची तुलना केली तर यंदा दर वाढले आहेत. शिवाय जीएसटीदेखील वाढली असल्याने स्टेशनरीवर त्याचा परिणाम झाला आहे. स्टेशनरीवरील १२ टक्क्यांची जीएसटी १८ टक्क्यांवर गेली आहे. मागील वर्षी लोकल कंपनीची शंभर पेजेसची वही ९ ते १० रुपयांची मिळत होती. ती यावर्षी १५ ते १६ रुपयांना मिळत आहे. तसेच दोनशे पेजेसची वही ही मागील वर्षी लोकल कंपनीची वही ही १६ ते १७ रुपयाला मिळत होती. तर यावर्षी त्याच वहीसाठी यंदा ३० ते ३५ रुपये मोजावे लागत आहे. याशिवाय इतर कंपनीची वहीसाठी मागील वर्षी ३८ ते ४० रुपये मोजावे लागत होते. तर यावर्षी ५५ ते ६० रुपये मोजावे लागत आहे. दोन रुपयांचा पेन यंदा तीन रुपयांना विक्री केले जात आहे.

१० रुपयांत पाच पेन येत होते. परंतु आता त्याच पेन साठी पंधरा रुपये मोजावे लागत आहे. तसेच जेल प्रति पेन १० रुपयांना विक्री होत होता. तर आता त्याच पेनासाठी १५ रुपये मोजावे लागत आहे. ७ रुपयांचा पेनसाठी तर आता १० रुपये मोजावे लागत आहे.

विक्रेत्यांची वाढली चिंता

दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आल्या. काही विद्यार्थ्यांना मात्र ऑनलाइन शिक्षणापासून वंचीत राहावे लागले आहे. त्यामुळे अनेकांनी शैक्षणिक साहित्य देखील खरेदी केले नाही. त्याचा परिणाम शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांवर झाला. त्यामुळे लाखों रुपयांचे नुकसान झाले.

बँकेचे हप्ते देखील भरणे अवघड झाले असल्याची खंत शैक्षणिक साहित्य विक्रेते भूषण दावनगिरे यांनी व्यक्त केली. किमान यंदा तरी व्यवसाय होईल अशी अपेक्षा आहे. परंतु शैक्षणिक साहित्य महागले असल्याने खर्चात वाढ झाली आहे. त्यात सर्वसामान्य लोक महागड्या वह्या, पुस्तके घेतील की नाही? असाही प्रश्न आता निर्माण झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com