औरंगाबाद : जगदीशनगरातील दूषित पाणीपुरवठा बंद करा

संतप्त महिलांची महापालिका प्रशासनाकडे मागणी
Aurangabad municipal corporation
Aurangabad municipal corporationsakal

औरंगाबाद : न्यू पहाडसिंगपुरा वॉर्डातील हनुमान टेकडी जगदिशनगर भागात विहिरीतून टॅंकरद्वारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र हे पाणी दुषित आहे. आधीच पाणी दूषित आणि त्यात आता पावसाळा सुरू आहे. यामुळे या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा दूषित पाणीपुरवठा बंद करून पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करावा या मागणीसाठी या भागातील महिलांनी महापालिकेत धाव घेतली. अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांना निवेदन देण्यात आले.

शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न उदभवल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून पर्यायी जलस्त्रोत शोधून त्या त्या भागाला पाणीपुरवठा केला जात आहे. पुर्वी हनुमान टेकडी जगदीशनगर परिसरात कोटला कॉलोनी येथील जलकुंभावरून टँकरने पाणी पुरवठा केला जात होता , मात्र आता अधिग्रहण केलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र या अधिग्रहित विहरीतील पाणीपुरवठा सुरू केल्यापासून पाणी दूषित येत आहे. यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साथरोगासह आजाराने लोक त्रस्त झाल्याचे संतप्त महिलांनी म्हटले आहे.

टँकरसाठी पैसे भरून सुध्दा आम्हला दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात चार दिवसाआड पाणी दिले जाते. यामुळे महापालिकेने जगदिशनगर परिसरात नळ कनेक्शन द्यावेत अशी मागणी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तसेच विहिरीतील दुषित पाणी पुरवठा तात्काळ बंद करावा अशी मागणी निवेदनात केली आहे. श्री. निकम यांनी महिला व नागरिकांना दोन दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले . या वेळी आम्रपाली सोनवणे ,सविता देवकर ,स्मिता पेरकर ,ज्योती लाहोट ,गीतांजली सोनकलगी ,सुशीला बागुल ,मीना किर्तक, निर्मला पवार, सुशीला पडवी, भाग्यश्री गायकवाड आदींसह जगदिशनगरमधील महिलांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com