Aurangabad : कश्यप गॅंगचा समर्थक म्होरक्या शुभम मोरे अखेर स्थानबद्ध

दुर्लभ कश्यपचा औरंगाबादेत असलेला म्होरक्या समर्थक शुभम सुरेश मोरे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता एमपीडीएखाली स्थानबद्ध केले
aurangaba
aurangabasakal

औरंगाबाद : मध्यप्रदेशातील उज्जैनचा कुख्यात गुन्हेगार दुर्लभ कश्यपचा औरंगाबादेत असलेला म्होरक्या समर्थक शुभम सुरेश मोरे (२२, रा. रेणुकानगर, जयअंबिका शाळेजवळ, गारखेडा परिसर) याला अखेर पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी एमपीडीएखाली स्थानबद्ध केले आहे. आरोपी मोरे याच्या वाढत्या गुन्हेगारी व धोकादायक कारवायांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच होता.

आरोपी शुभमवर पुंडलिकनगर पोलिसांत मुलींची छेड काढणे, बालकांचा लैंगिक छळ, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, घातक शस्त्राने आपखुशीने दुखापत करणे, घातक शस्त्रासह दंगा करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमानित करणे इत्यादीबाबत गुन्हे दाखल आहेत.

त्याच्यावर याआधी १०७ नुसार कारवाईही करण्यात आली होती, मात्र त्याच्यात काहीच फरक पडला नाही. विशेष म्हणजे, त्याच्याविरोधात १ जूनरोजीच स्थानबद्धतेचे आदेश काढण्यात आले होते. २६ सप्टेंबररोजी तो अखेर पोलिसांना सापडला. त्याला अटक करून मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले. ही कारवाई निरीक्षक अविनाश आघाव, पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहायक निरीक्षक खटाणे, सहायक फौजदार द्वारकादास भांगे, रमेश सांगळे, बाळाराम चौरे, राजेश यदमळ, गणेश डोईफोडे, गणेश वैराळकर शिवाजी गायकवाड, महादेव दाणे, दीपाली सोनवणे यांच्या पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com