कोरोना रुग्णांसाठी ५० खाटांचे आयसोलेशन सेंटर, अतुल सावेंचा पुढाकार

पुंडलिकनगर रस्त्यावर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने हे कोविड आयसोलेशन केअर सेंटर सुरु करण्यात येत आहे.
कोरोना रुग्णांसाठी ५० खाटांचे आयसोलेशन सेंटर, अतुल सावेंचा पुढाकार

औरंगाबाद : कोरोना (Corona) काळात गरजवंताना मदतीसाठी आमदार अतुल सावे (MLA Atul Save) यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून ५० खाटांचे मोफत कोविड आयसोलेशन सेंटर उभे केले आहे. या सेंटरमध्ये २० ऑक्सिजन खाटा ठेवण्यात आल्या आहेत. या संकटाच्या काळात नागरिकांना याची मोठी मदत होणार आहे. सोमवारी (ता.१७) सकाळी १० वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadanvis) यांच्या हस्ते या सेंटरचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती श्री. सावे यांनी रविवारी (ता.१६) पत्रकार परिषेदत दिली. पुंडलिकनगर रस्त्यावर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने हे कोविड आयसोलेशन केअर सेंटर (Covid Isolation Care Centre) सुरु करण्यात येत आहे. श्री. सावे म्हणाले की, या संकटाच्या काळात अनेक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहत आहेत. (Aurangabad Latest News 50 Beds Isolation Centre For Corona Patients, Atul Save Take Lead)

कोरोना रुग्णांसाठी ५० खाटांचे आयसोलेशन सेंटर, अतुल सावेंचा पुढाकार
नववधूने भल्या पहाटे प्रियकरासोबत पळ काढला, गळफास घेत संपवले जीवन

यात घरे छोटी असल्यामूळे अनेक गरजवंताना होम आयसोलेशन करताना अडचणी निर्माण होतात. हीच बाब लक्षात घेत हे विनामूल्य सेवा देणारे सेंटर सुरु करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्याच माध्यमातून डॉ. करजगांवर यांनी मोफत जागाही उपलब्ध करून दिली असल्याचेही आमदार सावे म्हणाले. या सेंटरवर कोविड केअर सेंटरमध्ये २० ऑक्सिजनचे बेड असून ३० साधे बेड आहेत. ५० रुग्णांना उपचार घेता येईल, अशी सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. डॉ.गिरीश वरकड, डॉ.उदयसिंग राजपूत या तज्ज्ञ डॉक्टरांव्यतिरिक्त १३ नर्सिंग कर्मचारी रुग्णांना सेवा देणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com