विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेपूर्वी चार दिवस मॉक टेस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेपूर्वी चार दिवस मॉक टेस्ट

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेपूर्वी चार दिवस मॉक टेस्ट

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्वच पेपर आता ऑनलाईन होणार आहेत. या पार्श्वभूमीवर २८ एप्रिल ते २ मेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी ‘मॉक टेस्ट’चे आयोजन केले आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्च व ६ एप्रिलपासून सुरु करण्यात आल्या. तथापि, १५ एप्रिल ते २ मेदरम्यान शासनाने निर्बंध घातल्याने सर्व पेपर स्थगित करण्यात आले. गेल्या आठवड्यात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक झाली.

हेही वाचा: धक्कादायक! कोविड सेंटरला जाण्याच्या सूचना मिळताच ४३ कोरोनाबाधितांनी काढला पळ

यात पुढील सर्व पेपर ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी कोविडचे सर्व नियम पाळून परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. सर्वच महाविद्यालयात आयटी को-ऑर्डिनेटर्सची संख्या दुपटीने वाढविली आहे. पदवीचे उर्वरित पेपर ३ मेपासून, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ५ मेपासून ऑनलाईन होईल. संबंधित विद्यार्थ्यानी २८ एप्रिल ते २ मेदरम्यान ‘ऑनलाईन मॉक टेस्ट’द्यावी. काही अडचण आल्यास महाविद्यालयाच्या आयटी को-ऑर्डिनेटरशी संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी केले.

Web Title: Aurangabad Latest News Bamu Decides Before Examination Mock Test

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :aurangabad
go to top