गंगापूर कारखाना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या घशात घालण्याचा डोणगावकरांचा डाव, आमदार प्रशांत बंब यांचा आरोप

Prashant Bamb News
Prashant Bamb News

औरंगाबाद : गंगापूर सहकारी साखर कारखाना हा तालुक्यातील शेतकऱ्यांची अस्मिता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या घशात कारखाना घालण्याचे काम कृष्णा पाटील डोणगावकर करीत आहेत. त्यांनीच खोटी कागदपत्रे देत कारखान्याच्या संचालक मंडळाविरुद्ध पोलिसांत बनावट तक्रार दाखल केली असल्याची टीका आमदार प्रशांत बंब यांनी शुक्रवारी (ता.१२) पत्रकार परिषदेत केली. गंगापूर कारखान्यातील १५ कोटींच्या अपहारप्रकरणी बंब यांच्यासह संचालक मंडळाविरुद्ध कृष्णा डोणगावकर यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी आमदार बंब म्हणाले, की आम्ही एक रुपयाचाही अपहार केलेला नाही. १५ कोटी ७५ लाख रुपये आल्यानतंर आम्ही शेतकऱ्यांना वाटप सुरु करु. यातील २ कोटी २१ लाख रुपयांची वाटपही केले. हे विरोधकांना कळल्यानंतर त्यांनी खोटी तक्रार दाखल केली. शेतकऱ्यांचा पैसा त्यांना वाटप करताना कसलाही अपहार झाला नसल्याचे लेखापरीक्षण अहवालातून सिद्ध झाले आहे. पोलिसांना आम्ही याबाबत दीड हजार कागदपत्रे उपलब्ध करून दिली आहेत. पोलिसांनी काही संचालकांचा जबाब नोंदवून त्यांना सोडून दिले आहे. कृष्णा डोणगावकर यांनी कारखाना वाचविण्यासाठी एक रुपयाचीही मदत केली नाही. मात्र, त्यांनी केलेल्या खोट्या तक्रारींमुळे इतर शेतकऱ्यांचे पैसे अडकून आहेत. कृष्णा डोणगावकर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे विविध ११ गुन्हे दाखल आहेत. यापैकी सात गुन्हे गंगापूर साखर कारखान्यासंबंधातील आहेत. कारखान्याचे अध्यक्ष असताना साखर निर्यात केल्याचे दाखवून त्यांनी देशातच विक्री करून भ्रष्टाचार केल्याचा आरोपही आमदार बंब यांनी केला.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com