esakal | महापालिकेला मिळाल्या सहा हजार लसी, दुसऱ्या डोससाठी प्राधान्य
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

महापालिकेला मिळाल्या सहा हजार लसी, दुसऱ्या डोससाठी प्राधान्य

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : शहरात लसींचा तुटवडा (Corona Vaccine Shortage) निर्माण झाल्यामुळे ४५ वर्षावरील नागरिकांच्या दुसऱ्या डोसचे वांधे झाले होते. अखेर महापालिकेला (Aurangabad Municipal Corporation) सहा हजार लसींचा साठा (Corona Vaccine) प्राप्त झाला आहे. त्यातून दुसऱ्या टप्प्यातील डोस नागरिकांना दिला जाणार आहे, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर (Neeta Padalkar) यांनी सांगितले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने शहरातील ११५ वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रावर काही दिवसांपासून लसीकरण केले जात होते. पण केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांसाठी लसींचा पुरवठा बंद पडला होता. (Aurangabad Latest News Finally Six Thousand Corona Vaccine Dose Reaches)

हेही वाचा: औरंगाबादेत १६ मेपासून हेल्मेट सक्ती, खंडपीठाने खडसावल्यानंतर पोलिसांचे ‘वरातीमागून घोडे’

त्यामुळे शुक्रवारपासून लसीकरण बंद पडले आहे. तर राज्य शासनामार्फत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना तीन केंद्रावर दररोज तीनशे लसी दिल्या जात आहेत. दरम्यान पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोससाठी लस कधी मिळणार याची माहिती शासनाकडून देखील दिली जात नव्हती. अखेर चार दिवस उलटून गेल्यावर आरोग्य विभागाकडून महापालिकेला सहा हजार लसी मिळतील, असे सांगण्यात आले आहे. पुणे येथून ही लस आणली जाणार आहे, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. पहिला डोस घेतल्यानंतर सहा ते आठ आठवड्यानंतर दुसरा डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्यानुसार आता ज्या नागरिकांना दुसरा डोस घ्यावयाचा आहे, अशा नागरिकांनीच आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी यावे, या लसीमधून पहिला डोस मिळणार नाही, त्यामुळे त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे डॉ. पाडळकर यांनी नमूद केले.

हेही वाचा: पहिलीत शिकणाऱ्या चिमुरड्याचा सर्पदंशाने जागीच मृत्यू

फक्त ५० केंद्रावर व्यवस्था

महापालिकेने दुसऱ्या डोससाठी फक्त ५० केंद्रावर व्यवस्था केली आहे. यापूर्वी शहरात ११५ वॉर्डात लसीकरण केले जात होते. पण लसींचा तुटवडा लक्षात घेता ५० केंद्रावर बुधवारी लस दिली जाणार आहे.

loading image