कौतुकास्पद! ‘त्यांच्या’ कृतीतून वाचली २५ वर्षे जुनी हजारो झाडे 

aurangabad couple
aurangabad couple

औरंगाबाद: व्यावसायिक दृष्टिकोनासोबत अनेक जण पर्यावरण वाचविण्यासाठी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून संदेश देतात. इतकेच नव्हे तर आपली कृती शंभर टक्के यशस्वी सुद्धा करतात. यामध्ये औरंगाबादेतील लेख मिठावाला आणि त्यांची पत्नी साक्षी मिठावाला यांचा समावेश होतो. लेख मिठावाला ‘सेव्ह ट्री, प्लँट ट्री’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रद्दीपासून पेपर पेन्सिल तयार करत आहे. त्यांच्या स्टार्टअपमधून हजारो जुनी झाडे वाचली आहेत. त्यांनी वर्ष २०१८ मध्ये सुरू केलेले ‘माय ब्रेन’ स्टार्टअप रद्दीपासून आगळ्यावेगळ्या पद्धतीने मुलांना खूप आवडेल अशा पद्धतीने सुंदर पेन्सिल तयार करत आहे. 

अशी सुचली कल्पना 
लेख मिठावाला हे शाळांमध्ये माय ब्रेन ट्रेनिंग चालवायचे. ते यादरम्यान कित्येक शाळांमध्ये गेले. तेथे शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. ते राबवत असलेले इको फ्रेंडली उपक्रम बघितले. हे सर्व बघत असताना विद्यार्थ्यांकडे सर्वाधिक इको फ्रेंडली कोणती वस्तू असावी, याचा त्यांनी प्रत्यक्षात अभ्यास केला. मग त्यांना रद्दीपासून पेन्सिल तयार करण्याची कल्पना सुचली. त्यावर त्यांनी काम करत पेपर पेन्सिल तयार करण्यासाठी २०१८ मध्ये माय ब्रेन स्टार्टअप सुरू केले. २०१८ मध्ये प्रत्यक्षात पेन्सिल सुद्धा तयार करण्यास सुरवात केली. 

पेन्सिलसाठी दरवर्षी तोडली जातात ८० लाख झाडे- 
लेख मिठावाला आणि साक्षी मिठावाला हे मागील दोन वर्षांपासून वॉपी येथील आपल्या प्रकल्पात रद्दीपासून पेन्सिल बनवत आहेत. भारतात लाकडी पेन्सिलसाठी दरवर्षी २५ ते ३० वर्षे वयाची तब्बल ८० लाख झाडे तोडावी लागतात. एका झाडापासून जवळपास २५०० पेन्सिल तयार होतात. हे इतकं सर्व वाचविण्यासाठी मिठावाला यांनी रद्दीपासून पेन्सिल बनविण्याचे काम सुरू केलं आहे. आपला व्यवसाय करताना पर्यावरण वाचले पाहिजे हे त्यांचे ध्येय आहे. कोरोनाअगोदर ते आपल्या वॉपी येथील कंपनीत दिवसाकाठी तिन्ही शिफ्टमध्ये तब्बल ६० हजार पेन्सिल तयार करत होते. एका पेन्सिलची किंमत पाच रुपये आहे. मागील दोन वर्षांपासून ते हे काम करतात.

सध्या त्यांना कोरोना आणि शाळा बंद असल्याने प्रॉडक्शन बंद ठेवावे लागले आहे. त्यांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. आपली पेपर पेन्सिलच्या प्रचारासाठी त्यांनी आजवर त्यांनी ५०० पेक्षा जास्त शाळांत प्रचार-प्रसार केला आहे. या पेन्सिलचे वैशिष्ट्य म्हणजे पेन्सिलच्या शेवटच्या टोकाला रबरऐवजी भाजीपाला, झाडांच्या बिया लावलेल्या आहेत. जेणेकरून मुलांनी पेन्सिल संपत आल्यानंतर ती जमिनीत टाकली तर बी रुजेल, त्यापासून पुन्हा वृक्षाची निर्मिती होईल. ‘सेव्ह ट्री प्लँट ट्री’ हा उद्देश सफल करण्यास यातून मदत होते. 

डबल न्यूज पेपरमध्ये दोन पेन्सिल- 
लेख मिठावाला हे रद्दीपासून पेन्सील तयार करतात, यासाठी शाळांमध्ये जाऊन जनजागृती केली. शिवाय विद्यार्थ्यांनाच पेपर, वह्यांची रद्दी देण्याची विनंती केली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या एक किलो रद्दीमागे ते विद्यार्थ्यांना दोन पेन्सिल देत होते. त्यांच्याकडील एका पेन्सिलची किंमत ही पाच रुपये आहे. डबल न्यूज पेपरमधून त्या कंपनीत दोन पेन्सिल तयार होतात. कारखान्यात रोल करून ती तयार केली जाते. पॉलिशिंग केल्यानंतर रद्दीपासून तयार करण्यात आलेली पेन्सिल ही लाकडी पेन्सिलच्या तोडीस तोड दिसते. त्यांना आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर टाकाऊपासून टिकाऊ पेन्सिल तयार केल्या इतकेच नव्हे तर पर्यावरण वाचविण्यासाठी आपला मोलाचा वाटा उचलला. 

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने आमच्याकडे माल तयार आहे. शाळा उघडण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. आमचे स्टार्टअप असल्याने मार्केटमध्ये स्पर्धक, दुकानदार, पेमेंट अशा अनेक अचडणी येतात. तरीही आम्ही आमचे ध्येय घेऊन पुढे जात आहोत. रद्दीपासून मुलांना आम्ही स्टॅडर्ड पेन्सिल दिली आहे. 

- लेख मिठावाला

(edited by- pramod sarawale) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com