esakal | उशिरा सुचले शहाणपण! कोरोनाला रोखण्यासाठी नागरिक शेतवस्त्यावर..

बोलून बातमी शोधा

Increase private centers; Speed ​​of vaccination is required to prevent corona
उशिरा सुचले शहाणपण! कोरोनाला रोखण्यासाठी नागरिक शेतवस्त्यावर..
sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : सुलतानपुर (ता.पैठण) येथील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी आता ग्रामस्थही जागरूक होत असुन तहसिलदार चंद्रकांत शेळके, मुख्याधापक गजानन नेहाले व अन्य कर्मचाऱ्यांच्या जनजागृतीनंतर गावांतील बहुतांश कुटुंबियांनी शेतवस्त्यांवर स्थलांतरीत होऊन स्वतःहून विलगीकरण करून घेतले आहे. तहसिलदार श्री.शेळके यांनी सदरील गावास भेट देऊन ग्रामस्थांना घाबरुन न जाण्याचे आवाहन केले व स्वतःसह मुख्याधापक श्री. नेहाले, मंडळाधिकारी इंदेलसिंग बहूरे, तलाठी श्री. बोंद्रे, कृषी सहायक श्री.देवरे, शिक्षक ए. ए.फड, पी. आर.चव्हाण, एम. एल.उकिरडे, पोलिस पाटील माणिक दौंड आदींनी गावकऱ्यांत कोरोनाकडे दुर्लक्ष केल्यास होणारे दुष्परिणामाविषयी माहिती दिल्याने ग्रामस्थांनी आता कोठे कोरोनाचे गांभीर्याने घेतले. एकंदरीत ग्रामपंचायत सदस्य गजानन दौंड यांनी स्वखर्चातुन गावांत सॅनिटायझरची फवारणी केली.

हेही वाचा: गावकऱ्यांच्या एकोप्यामुळे 'कोरोना'ला रोखले, गावात एकही रुग्ण पाॅझिटिव्ह नाही!

गावात सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येत असून त्यांना कोविड पॉझिटिव्ह रुग्णांपासुन स्वतःची काळजी घेणे, बाधित रुग्णांशी करावयाचा व्यवहार, बाधित रुग्णांचे उपचार पद्धती, सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर या विषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतवस्तीवर विलगीकरण केलेल्या नागरिकांना उपरोक्त सर्व विभागांचे कर्मचारी त्यानंतर औषध गोळ्याची पूर्तता, चौकस आहारविषयी मागदर्शन करुन त्यांची काळजी घेत आहे. गजानन दौंड, एकनाथ आंधळे, रमेश दौंड यांनी गावात आरोग्यपथक तैनात नियुक्त करण्याची मागणी केली. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी गावातील ग्रामस्थांना घाबरुन न जाण्याचे आवाहन करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी निवडलेला विलगीकरणाचा पर्याय योग्य असल्याचे सांगितले.