औरंगाबादने घडवला इतिहास, २५० इलेक्ट्रिक कारची बुकिंग

एकाच वेळेस १०१ इलेक्ट्रिक कार वितरित
Electric Car
Electric CarElectric Car

औरंगाबाद : शहराला ईव्ही मॅपवर नेण्यासाठी व ईव्ही इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी, दोन महिन्यांपूर्वी मराठवाडा ऑटो क्लस्टरने ‘औरंगाबाद मिशन ग्रीन मोबिलिटी (ईव्ही) या अभियानाची सुरुवात केली. त्यात एकाच वेळी २५० कार खरेदी करण्यात आल्या. त्यापैकी १०१ कारचे वितरण सोमवारी (ता. १४) एका हॉटेलमध्ये करण्यात आले.

वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. त्यात औरंगाबाद शहराने बाजी मारली आहे. सोमवारी एकच दिवसात २५० ईव्ही कार बुक करण्यात आल्या व त्यांपैकी १०१ कारचे वितरणही करण्यात आले. यावेळी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स व टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले, ‘केवळ वैयक्तिक योगदान म्हणूनच नव्हे तर औरंगाबाद शहर हरित, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घेत आहे, हे पाहून आनंद वाटतो.

टाटा मोटर्स औरंगाबाद मिशन ग्रीन मोबिलिटी अभियानाचा एक भाग असल्याचा सन्मान वाटतो. टाटा मोटर्सने आत्तापर्यंत २० हजार ईव्ही कार विकल्या आहेत. यामुळे १० हजार मेट्रिक टन कार्बन एमिशन कमी होण्यास मदत झाली, हे दीड लाख झाडे लावण्यासारखे असल्याचे ते म्हणाले. उल्हास गवळी म्हणाले, राष्ट्रीय हरित लवादाकडून प्रदूषणाच्या कारणामुळे शहरावर काही निर्बंध लावण्यात आले होते, यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या. त्यात आपणही पुढाकार घ्यावा, असा विचार करून या मिशनला सुरवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात कार, त्यानंतर इलेक्ट्रिक तीन चाकी, दुचाकी व बसही औरंगाबादच्या रस्त्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासक आस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांची उपस्थिती होती. स्मार्ट सिटी अभियानात ईव्ही पॉलिसीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहर वाहतुकीसाठी ६० नवीन ईव्ही बस येतील. अधिकाऱ्यांसाठी ईव्ही कार घेण्यात आल्या. शहराबाबत २०० हून अधिक चार्जिंग स्टेशन निर्माण करण्यात येणार आहे, असे श्री. पांडेय यांनी सांगितले.

यावेळी राम भोगले, मानसिंग पवार, शिवप्रसाद जाजू, प्रसाद कोकीळ, आशिष गर्दे, ऋषी बागला, मुनीष शर्मा, गिरिधर संगेरिया, डॉ. उल्हास गवळी, प्रशांत देशपांडे, सतीश लोढा, सचिन मुळे, अभय हंचनाळ, मनीष धूत यांची प्रमुख उपस्थिती होती. राजलक्ष्मी लोढा यांनी प्रास्ताविक केले. सतीश लोढा यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com