मुख्य जलवाहिनीसाठी पाइपची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलवाहिनी

औरंगाबाद : मुख्य जलवाहिनीसाठी पाइपची प्रतीक्षा

औरंगाबाद : शहराच्या नव्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मुख्य जलवाहिनीचे काम एक एप्रिलपासून सुरू करण्याची तयारी केली जात आहे. पण अद्याप पुरेशा प्रमाणात पाइपची निर्मिती झालेली नाही. दरम्यान, जलवाहिनीसाठी लागणाऱ्या जागेच्या भूसंपादनाचे शुल्क महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने भरले आहे. तसेच जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान आखणीही देण्यात आली आहे.

राज्य शासनाने शहरासाठी मंजूर केलेल्या १६८० कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केले जात आहे. पहिल्या टप्प्यातील १३०८ कोटी रुपयांची निविदा जीवन प्राधिकरणाने हैदराबाद येथील जीव्हीपीआर या कंपनीला दिली आहे. यातील मुख्य आणि मोठे काम जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान सुमारे ३९ किलोमीटर मुख्य जलवाहिनी टाकण्याचे आहे. हे पाइप २५०० मिलिमीटर व्यासाचे आहेत.

ही पाइपलाइन पैठण रस्त्याच्या बाजूने टाकली जाणार आहे. या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत केले जाणार आहे. त्यामुळे या विभागाची मान्यता आवश्यक होती. प्राधिकरणाने मंजुरी देताना भूसंपादनापोटी शुल्क भरण्याची सूचना केली होती. त्यानुसार प्राधिकरणाने पाच कोटी ८० लाख रुपये शुल्क नुतकेच जमा केले आहे. तसेच सव्वा कोटी रुपयांची बँक गॅरंटी जमा केली आहे. यासंदर्भात मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड यांनी सांगितले की, मुख्य पाइपलाइनसाठी रस्त्याच्या बाजूने जागा उपलब्ध आहे, त्यामुळे भूसंपादन करण्याची गरज भासणार नाही. जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान आखणी देखील करण्यात आली आहे. हे काम आठ-दहा दिवसांपूर्वी संपले. एप्रिल महिन्यात मुख्य पाइपलाइनचे काम सुरु होईल.

निविदेतील दरानुसारच काम

लोखंडासह इतर वस्तूंचे दर वाढल्याचा मुद्दा कंत्राटदाराने उपस्थित केला आहे. त्यावर लोलापोट यांनी सांगितले की, पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी भाववाढ हा मुद्दा लागू नाही. निविदेतील दरानुसारच कंत्राटदार कंपनीला काम करावे लागेल.

Web Title: Aurangabad Main Water Pipe For The Waiting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Aurangabad News
go to top