औरंगाबाद : मॅरेथॉनमध्ये धावले अडीच हजार स्पर्धक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ग्रामीण पोलिस दलातर्फे स्पर्धेचे आयोजन
 मॅरेथॉन
मॅरेथॉनsakal

औरंगाबाद : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलातर्फे आयोजित १० किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत अडीच हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. विविध गटात किशोर विठ्ठल मरकड, पूजा तानाजी ढवळे, सिद्धेश्वर अल्हट, शीतल सुपडू जाधव हे विजेते ठरले. प्रथम विजेत्यांना स्पोर्ट सायकल, द्वितीय ठरलेल्यांना ओव्हन, तर तृतीय स्पर्धकाला मिक्सर ग्राइंडर देण्यात आले. तसेच या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेत पोलिस अधीक्षकांसह इतर अधिकाऱ्यांनीही भाग घेत स्पर्धकांचा उत्साह वाढविला.

अधीक्षक मनीष कलवानिया, अपर अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या संकल्पनेतून समृद्धी महामार्ग, सावंगी टोलनाकाजवळ १० किलोमीटर मॅरेथॉन २०२२ स्पर्धा पार पडली. स्पर्धेत एकूण अडीच हजार स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर स्वतः पोलिस अधीक्षक कलवानिया यांनी १० किलोमीटरचा टप्पा पार केला.

विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, राज्यकर विभागाचे सहआयुक्त जी. श्रीकांत, सीईओ नीलेश गटणे, आरआरबीचे समादेशक निमित गोयल, एसीबीचे अधीक्षक राहुल खाडे यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचे उद्‍घाटन केले. स्पर्धेसाठी पोलिस दलास व्हेरॉक कंपनी ग्रुपचे सतीश मांडे, राहुल टेकाळे, अलाना ग्रुप कंपनी दीपक कुमार मेहता, कॅनरा बँक पंकज गजभिये, उत्तम एनर्जीचे विकास कांबळे, अजिंठा फार्मा लि. व्यापारी असोसिएशनचे पवन लोहिया, स्वस्तिक एजन्सी राधेश्याम तोष्णीवाल, स्टेपिंग स्टोन स्कूलचे राजित खान, उडरिच स्कूल रणजित खोडे, महिंद्रा सी.आय.ई ऑटोमोटिव्हचे सुरेश चंद्राव सत्यनारायण दायमा, प्रदीप मानकापे, रायन इंटरनॅशनल स्कूल तसेच अजित मेटे, भगवान मते (कॉन्ट्रॅक्टर), समृद्धी महामार्ग प्रशासन यांचे प्रायोजकत्व व सहकार्याने ही मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण झाली. स्पर्धेसाठी जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते

पुरुष गट ः (पोलिस /होमगार्ड विभाग) प्रथम ः किशोर विठ्ठल मरकड (वेळ ३१ मिनिटे ५२ सेकंद), प्रवीण भाऊसाहेब सांगळे (द्वितीय-३८.२५), गुरुमुखसिंग फुलसिंग सुलाने (तृतीय- ४०.३३). महिला गट) (पोलिस/होमगार्ड विभाग) : पूजा तानाजी ढवळे (प्रथम ६०.२०), सुशीला रमेश पवार (द्वितीय ६९.४८), मोहिनी चंद्रकांत लंबे (तृतीय ७२.०७).

सर्वसाधारण पुरुष गट ः सिद्धेश्वर अल्हट (प्रथम ४२.८९), कुलदीप चव्हाण (द्वितीय ४३.२८), धरम भवरे (तृतीय ४५.००). सर्वसाधारण महिला गट) शीतल सुपडू जाधव (प्रथम ५८.०६), बाबर परिमला बसालसाहेब (द्वितीय ५९.४३), सुहानी सुधीर खोब्रागडे (तृतीय ६१.२०).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com